पाकिस्तानचे पंतप्रधान येताच ‘चोर चोर’च्या घोषणा

पाकिस्तानचे पंतप्रधान येताच ‘चोर चोर’च्या घोषणा

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ हे सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान एक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ हे मदिना येथील मस्जिद-ए-नवाबीमध्ये प्रवेश करत होते. त्यावेळी उपस्थित काही लोकांनी नारेबाजी केली. त्यानंतर या नारेबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे आपल्या प्रतिनिधी मंडळासह तीन दिवसाच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत पाकिस्तानचे माहिती मंत्री मरियम औरंगजेब आणि राष्ट्रीय संसदेचे सदस्य शाहजैन बुगती यांचाही समावेश आहे. त्यानंतर जेव्हा शाहबाझ शरीफ हे मस्जिद-ए-नवाबीमध्ये प्रवेश करत होते तेव्हा काही लोकांनी ‘चोर, चोर’ असे नारे दिले.

हे ही वाचा:

शूजमधून सोनं लपवून तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

संगमनेरमध्ये कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप

शिवसेना खासदार भावना गवळींना अटक होणार?

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लोकांनी अशा प्रकारे विरोध करण्याला अप्रत्यक्षपणे माजी पंतप्रधान इमरान खान जबाबदार असल्याचे मरियम औरंगजेब यांनी म्हटले आहे. तसेच मी त्या व्यक्तीचे नाव घेऊ शकत नाही, कारण या पवित्र भूमीचा वापर मला राजकारणासाठी करायचा नाही. पण त्यांनी पाकिस्तानी समाजाला उध्वस्त केल आहे, असे मरियम औरंगजेब यांनी म्हटले.

Exit mobile version