23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनिया६२ वर्षे झाली, आता ऑस्करविजेते रेड कार्पेटवरून चालणार नाहीत

६२ वर्षे झाली, आता ऑस्करविजेते रेड कार्पेटवरून चालणार नाहीत

सहा दशकांची परंपरा मोडीत काढणार

Google News Follow

Related

बारा मार्चला ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजलिस येथे डॉल्बी थिएटर मध्ये पार पडणार आहे. सिनेजगतात कोणत्याही पुरस्कार सोहोळ्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. ऑस्कर सारख्या पुरस्कार सोहळ्याचे रेड कार्पेटवर वेगवेगळ्या सेलिब्रिटीना पाहण्यास दर्शक उत्सुक असतात.

पण पहिल्यांदाच ६२ वर्षात या रेड कार्पेट ऐवजी पांढऱ्या रंगाचे कार्पेट वापरणार असल्याची माहिती समोर येत आहे. जगभरात ऑस्कर पुरस्कार सोहोळ्याची सिनेविश्वाला आणि प्रेक्षकांना सुद्धा याबद्दल उत्सुकता असते. यात गेल्या काही वर्षात या हॉलिवूड पुरस्कारांमध्ये  बॉलीवूड्चे कलाकार पण असल्यामुळे आपल्याकडे त्याची अजून उत्सुकता असते.

ऑस्कर च्या पुरस्कार सोहोळ्याआधी त्या रेड कार्पेट वर कोणती अभिनेत्री आपल्या सौन्दर्याची भुरळ घालणार हे महत्वाचे असते. अनेक सेलिब्रिटी या आपण इतरांपेक्षा कसे वेगळे दिसू याची स्पर्धा बघायला मिळते. पण यंदाच्या वर्षी हे रेड कार्पेट नसणार आहे, कारण यंदा या कार्पेटचा रंग बदलण्यांत येणार असून तो पांढरा करण्यांत आला आहे. उपस्थित सेलिब्रिटींचे प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करण्यासाठी कार्पेटचा रंग बदलल्याचे बोलले जात आहे.

१९६१ सालापासून ऑस्कर पुरस्कार सोहोळ्यांत रेड कार्पेटचा समावेश करण्यांत आला होता. १९६१ पासून म्हणजे ३३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहोळ्यापासून रेड कार्पेट अंथरले जात होते. पण आता ६२ वर्षांनी या कार्पेटच्या रंगामध्ये बदल करण्यांत येत आहे.  ऑस्करचे नियोजन करणाऱ्या अकॅडमि ऑफ मोशन पिक्चर्सने यावेळेस लाल रंगाऐवजी  पांढरा  रंग कार्पेटसाठी निवडला आहे.

हे ही वाचा:

कांदिवलीच्या समतानगर ‘एकदुजे के लिए’; प्रेमी युुगुलाने उचलले हे पाऊल

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार

वृक्षतोडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जा, उच्च न्यायालयाने काढली याचिका निकाली

सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद, दिल्ली पोलिसांना फार्म हाऊसमध्ये ही गोष्ट सापडली

यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार सोहोळा आपल्यासाठी खास असणार आहे. एस.एस.राजामौलीच्या आरआरआर या चित्रपटातील ‘नाटु नाटु’ या गाण्याला  ऑस्कर साठी नामांकन आहे. म्हणूनच ऑस्कर २०२३ कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्या १२ मार्चला हा सोहळा लॉस एंजलिस येथे डॉल्बी थिएटर मध्ये पार पडणार असून भारतीय वेळेप्रमाणे भारतीयांना हा सोहळा १३ मार्चला पहाटे साडेपाच वाजता बघता येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा