इस्लामिक देशांची संघटना हिजाब वादात गुंतली, मात्र भारताने दिले चोख उत्तर

इस्लामिक देशांची संघटना हिजाब वादात गुंतली, मात्र भारताने दिले चोख उत्तर

Foreign ministers of the Organisation of Islamic Cooperation OIC meet in the Saudi capital Riyadh on September 15, 2019. - The OIC today expressed its "total rejection" of Israeli prime minister's pre-election pledge to annex part of the West Bank. Battling to win re-election in polls on September 17, Netanyahu issued a deeply controversial pledge last week to annex the strategic Jordan Valley, which accounts for around a third of the occupied West Bank. (Photo by - / AFP)

कर्नाटकातील शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी नसल्याच्या वादाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुस्लिम देशांच्या संघटना इस्लामिक कोऑपरेशनने या मुद्द्यावर भाष्य करत भारताला सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याबाबात भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने ट्विट केले होते की, ”ओर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनचे सचिवालय भारताकडे मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेची, हिताची काळजी घेण्याची मागणी करत आहेत. इस्लामचे पालन करणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीचे रक्षण करा. याशिवाय हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या आणि द्वेषमूलक गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.”

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रकरणात हस्तक्षेप करून मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदे दरम्यान द्वेषयुक्त भाषणाबाबत भारताला उपदेश करण्याचा प्रयत्नही इस्लामिक कोऑपरेशन संघटनेने केला आहे.

हे ही वाचा:

भारतीय नागरिकांनाही युक्रेनमधून बाहेर पडण्याचे आदेश

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी!

… म्हणून उत्तराखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हरीश रावत मतदानाला मुकले

येत्या ४८ तासांत रशियाचे युक्रेनवर आक्रमण?

मात्र, इस्लामिक कोऑपरेशन संघटनेच्या भूमिकेवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून भारतात सर्व धर्माचे लोक आनंदाने राहत असल्याचे म्हटले आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, ” जर पाकिस्तानातील मुलीने जय श्री रामचा नारा दिला असता तर तिचा शिरच्छेद केला असता.”

इस्लामिक सहकार्य संघटनेत एकूण ५७ मुस्लिम देशांचा समावेश आहे, ज्यामध्ये पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया सारख्या मोठ्या मुस्लिम देशांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र संघानंतर ही जगातील दुसरी सर्वात मोठी संघटना मानली जाते. इस्लामिक विषयांवर त्याच्या बैठका अनेकदा होतात. यामध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी पाकिस्तानकडून अनेकदा प्रयत्न करण्यात आले, मात्र आजतागायत त्यात यश आलेले नाही.

Exit mobile version