हा पाहा पुन्हा न्यूयॉर्क टाईम्सचा भारतविरोधी चेहरा!

हा पाहा पुन्हा न्यूयॉर्क टाईम्सचा भारतविरोधी चेहरा!

अफगाणिस्तानात तालिबानचा विजय झाल्यानंतर तेथे अराजक निर्माण झाले आहे. अशा वेळेस तिथे अडकलेल्या सुरक्षितरित्या लोकांना बाहेर काढण्याचे काम भारताने सुरू केले आहे. त्यावेळेस सातत्याने भारतविरोधाची गरळ ओकणाऱ्या न्यूयॉर्क टाईम्सने देखील भारताकडे मदत मागितीली होती. मात्र त्यानंतर त्यांनी कृतघ्नताच दर्शवून, अफगाणिस्तानातून शिख आणि हिंदू नागरीकांना बाहेर काढण्याच्या निर्णयाला नव्या नागरिकत्व कायद्याशी जोडले आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने त्यांच्या पत्रकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारताकडे मदत मागितली होती. न्यूयॉर्क टाईम्सने यापूर्वी देखील अनेक वेळा भारत विरोधी चेहरा दर्शवला होता. इतके असूनही त्यांना अफगाणिस्तानातून आपल्या पत्रकारांना वाचवण्यासाठी भारताचीच मदत मागावी लागली होती.

हे ही वाचा:

भोंदू बाबाचा वेष घेत महिलेवर बलात्कार! मुख्य आरोपी यासिन शेख अटकेत

रौप्य पदक जिंकूनही मोदींची रवी दहियाकडे तक्रार का?

तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद

ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र

आता न्यूयॉर्क टाईम्सने पुन्हा एकदा आपला भारतविरोधी चेहरा एका बातमीद्वारे उघड केला आहे. पत्रकार आदित्य राज कौल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये न्यूयॉर्क टाईम्सची एक बातमी दिली आहे. ज्यामध्ये भारताच्या अफगाणिस्तानातून हिंदू आणि शिखांना आधी बाहेर काढण्याच्या निर्णयाला नव्या नागरिकत्व कायद्याशी जोडले आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने यापूर्वी कोरोनाकाळात दिल्लीत पेटलेल्या चितांचे फोटो टाकून भारत विरोधी जळजळ ओकली होती. त्याच्याही आधी भारताच्या अवकाश मोहिमेवर एका व्यंगचित्राद्वारे टीका केली होती. नुकतंच न्यूयॉर्क टाईम्सकडून भारतातील त्यांच्या करस्पॉन्डन्टसाठी पात्रता लिहीताना हिंदुविरोध आणि मोदीविरोधी असणं आवश्यक असल्याचं लिहीले होते.

Exit mobile version