“द एलिफंट व्हिस्परर्स”मुळे तामिळनाडू सरकार माहुतांसाठी केली घोषणा

"द एलिफंट व्हिस्परर्स"च्या प्रभावामुळे तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

“द एलिफंट व्हिस्परर्स”मुळे तामिळनाडू सरकार माहुतांसाठी केली घोषणा

तामिळनाडू सरकारने हत्तीची काळजी घेणाऱ्याना अर्थात माहुतांना मदत जाहीर केली आहे. डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म प्रकारामध्ये “द एलिफंट व्हिस्परर्स” या माहितीपटाने ऑस्करचा पुरस्कार जिंकला आहे. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून हत्ती आणि त्याचे काळजीवाहक अर्थात माहूत यांची गोष्ट दाखवली गेली आहे. याच डॉक्युमेंट्रीमुळे आता तामिळनाडू सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आहे अशी माहिती आज एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करत दिली आहे.

तामिळनाडू सरकारने राज्यांतल्या दोन छावण्यांमधील ९१ हत्तीच्या केअर टेकर्ससाठी अर्थात माहूत यांच्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची घोषणा केली आहे. शिवाय, या हत्तीची काळजी घेणारे माहूत यांना घर बांधण्यासाठी नऊ पूर्णांक एक कोटी (९.१) रुपयांची तरतूद देखील करण्याचे ठरवले आहे. अनामलाई व्याघ्र प्रकल्पातील एलिफन्ट कॅम्प विकसित करण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद सुद्धा तामिळनाडू सरकारकडून करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

ग्राहक म्हणून तुमचे हक्क तुम्हाला माहिती आहेत का ?

सावधान महाराष्ट्रात एन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढतोय

अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या

‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन

कोईम्बतूर चावडी येथे आठ कोटी रुपये खर्च करून मूलभूत सुविधांसह नवीन एलिफन्ट कॅम्प बांधण्यात येणार आहेत. “द एलिफन्ट कॅम्प” या डॉक्युमेंट्रीने ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हि घोषणा केली आहे.

या डॉक्युमेंट्रीमध्ये मधुमलाई येथील टायगर रिझर्व्ह मधील हे माहूत जोडपे बोमन आणि बेली यांच्यावर हि कथा आधारित असल्याचे दाखवण्यात आले असून ४० मिनिटांची हि कथा आहे. एका अनाथ हत्तीला एक जोडपे दत्तक घेते आणि त्याचा आपल्या मुलाप्रमाणे कसा सांभाळ करतात. हे या माहितीपटात  दाखविण्यात आले आहे. दरम्यान, सिक्ख्या एंटरटेनमेंट चे गुनीत मोंगा आणि अंचिन जैन यांनी या माहितीपटाच्या निर्मिती केली असून या माहितीपटामध्ये तामिळनाडू वनविभागाची कार्यप्रणाली आणि हत्तीच्या संगोपनासाठी केले प्रयत्न दाखविण्यात आले आहेत.

Exit mobile version