…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्य मोहिमेचा अखेर १९ वर्षे, १० महिने आणि २५ दिवसांनी शेवट झालाय. तालिबानने अमेरिकेला ३१ ऑगस्टपर्यंत मदत मोहिमेला मूदत देऊन देश सोडण्यास सांगितलं होतं. त्यामुळे ३१ ऑगस्टच्या शेवटापर्यंत अफगाणमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याची मोहिम चालेल असा अंदाज होता. मात्र, अमेरिकेने ३० ऑगस्टच्या रात्रीच अफगाणिस्तान सोडलं. यानंतर तालिबानने लगेचच अफगाणसाठी स्वातंत्र्य दिवस असल्याचं घोषित केलं.

अमेरिकेच्या शेवटच्या ३ सी-१७ विमानांनी ३० ऑगस्टला रात्री उरलेल्या अमेरिकन सैनिकांसह हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डान केलं. यासह अमेरिकेचं अफगाणमधील अस्तित्व संपलंय. हा अफगाणमधील युद्धाचा शेवट की नव्या युद्धाची आणि अनागोंदीची सुरुवात हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी अफगाणमध्ये शरिया कायद्याच्या नावाखाली सर्वसामान्यांवर अनेक निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे अफगाणचं भविष्य सध्या तरी तालिबानी नियंत्रणात अंधारातच दिसत आहे.

पत्रकार मुराद यांनी अमेरिकेचे उरलेले सैनिकही अफगाण सोडून अमेरिकेला परतल्याचं सांगत हा येथील युद्धाचा शेवट असू शकतो, असं मत व्यक्त केलंय. मुराद म्हणाले, “अफगाणिस्तानमधील अमेरिकन सैन्याचं युद्ध १९ वर्षे, १० महिने आणि २५ दिवस चाललं. अखेरच्या अमेरिकन सैनिकांनीही काळी वेळापूर्वी अफगाणिस्तान सोडले. आता युद्ध संपलंय.” अमेरिकेने अफगाण सोडल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला विजय साजरा केलाय.

हे ही वाचा:

भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

बनावट तिकीट तपासनीसांचीच झाली तपासणी

आता श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराची प्रतीक्षा

ठाणे महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी मोजावे लागणार ९२ कोटी

इसिसिनं आधी काबूल एअरपोर्टवर हल्ला केला, ज्यात १६९ अफगाण नागरीक आणि १३ अमेरीकन सैनिकांचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून अमेरीकेनं इसिसिच्या ठिकाण्यांवर ड्रोन हल्ला केला. परत याचा बदला म्हणून इसिसिनं हल्ला केल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार दोन जणांना जीव गमवावा लागलाय. काही जण जखमी आहेत. मृत आणि जखमींमध्ये मुलं आणि महिलांचा समावेश आहे. एअरपोर्टकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून १ कि.मी. अंतरावर हा हल्ला केला गेलाय.

Exit mobile version