अफगाणिस्तानला टाळी, पाकिस्तानला टपली

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्तकी यांची दुबईत भेट

अफगाणिस्तानला टाळी, पाकिस्तानला टपली

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हे दुबईच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्तकी यांची दुबईत भेट घेतली. ही भेट अत्यंत महत्त्वाची असून २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत परतल्यानंतर अफगाणिस्तान सरकारसोबत भारताची ही पहिली उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा होती. त्यामुळे या भेटीकडे विशेष लक्ष होते.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या या चर्चेत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांपासून प्रादेशिक विकासापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मानवतावादी मदत, विकासात्मक सहाय्य, व्यापार, वाणिज्य, क्रीडा, सांस्कृतिक संबंध, प्रादेशिक सुरक्षा आणि चाबहार बंदरासारखे राष्ट्रीय हिताचे प्रकल्प यासह विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांना चालना देणे हा दुबईतील बैठकीचा अजेंडा होता.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चर्चेमध्ये अफगाणिस्तानातील भारताच्या सुरक्षेची चिंता, नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांमधील विकास प्रकल्पांवर विचार करण्याची गरज, पाकिस्तानातून आलेल्या अफगाण निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी मदत या मुद्द्यांवर चर्चा झाली. विकास उपक्रमांची सध्याची गरज लक्षात घेता, नजीकच्या भविष्यात भारत विकास प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचा विचार करेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय इराणच्या चाबहार बंदराचा वापर आणि दोन्ही देशांमधील लोकप्रिय खेळ क्रिकेट यावरही चर्चा झाली.

अफगाण सरकारने भारताच्या सुरक्षेची चिंता विचारात घेतली. अफगाणिस्तानच्या भूमीतून भारतविरोधी दहशतवादी गटांना वाढू देऊ नये ही भारताची सर्वात मोठी चिंता आहे. अफगाणिस्तानची भूमी भारताविरुद्ध वापरू दिली जाणार नाही, यावर तालिबानने जोर दिल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे; होणार कारवाई

रशियाचा युक्रेनच्या झापोरिझिया शहरावर क्षेपणास्त्र हल्ला; १३ ठार

‘हिंदूंना एका धाग्यात बांधणारा उपक्रम म्हणजे हिंदू आध्यात्मिक सेवा मेळावा’

मंगल प्रभात लोढांच्या हस्ते देशातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण!

यादरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी भारत आणि अफगाणिस्तानमधील लोकांमधील ऐतिहासिक मैत्रीवर भर दिला. दोन्ही बाजूंनी भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या मानवतावादी सहाय्य कार्यक्रमांचे मूल्यमापन केले. अफगाणिस्तानच्या मंत्र्याने याबद्दल भारत सरकारचे कौतुकही केले. यापूर्वीही भारताने अफगाणिस्तानला अनेक शिपमेंट पाठवले आहेत, ज्यात ५० हजार मेट्रिक टन गहू, ३०० टन औषधे, २७ टन भूकंप निवारण मदत, ४०,००० लिटर कीटकनाशके, पोलिओच्या १० कोटी डोस यांचा समावेश आहे. शिवाय कोविड लसीचे १५ लाख डोस, व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी ११,००० युनिट किट, ५०० युनिट हिवाळी कपडे आणि १.२ टन स्टेशनरी किट यांचाही समावेश आहे.

Exit mobile version