आता परदेशातील प्रेक्षकही बघणार ‘द केरला स्टोरी’

१२ मे रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता

आता परदेशातील प्रेक्षकही बघणार ‘द केरला स्टोरी’

देशातल्या चित्रपटगृहांमध्ये ५ मी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने आतापर्यंत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या या चित्रपटाला काही लोक राजकीय विरोध करत असले तरी देखील या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. भारतात गर्दी खेचत असलेला हा चित्रपट आता जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आला आहे.
हा चित्रपट ब्रिट आणि आयलंडमध्ये कोणत्या भाषेत प्रदर्शित होणार याची माहिती चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्मा हिने या बाबतचे ट्विट रिट्विट करत दिली आहे. हा चित्रपट ब्रिटनमध्ये मध्ये हिंदी आणि तमिळमध्ये प्रदर्शित होणार आहे असल्याचे सांगण्यात येत आहे. आयर्लंडमध्ये हा चित्रपट फक्त हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

गेल्या शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या’द केरला स्टोरी’ चित्रपताणें सुरुवातीला ८ कोटींची कमाई केली पण नंतर त्यात सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अव्वल स्थान पटकावले आहे.’द केरळ स्टोरी’ने पहिल्या आठवड्यामध्ये बॉक्स ऑफिसवर ३५.९२ कोटींची कमाई केली होती. मंगळवारी ‘द केरळ स्टोरी’ने एकच दिवसात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे १०.९९ कोटींचा व्यवसाय केला. पाच दिवसांत, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर भारतात ५६.७१ कोटी रुपयांची कामे केली आहे.

हे ही वाचा:

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पेटला!

ईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, कर्नाटकमधील ‘हा’ समज बदलणार?

‘द केरला स्टोरी’ उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी नाही, परंतु थिएटर मालकांनी चित्रपटगृहांमधून हा चित्रपट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रतही हा चित्रपट करमुक्त करण्याच्या बाबतीत विचार करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना  चित्रपट ब्रिटन  आणि आयर्लंडमध्ये १२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version