”द केरळ स्टोरी” पोहोचला १०० कोटींच्या जवळ

चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ९४ कोटी रुपये झाले आहे.

”द केरळ स्टोरी” पोहोचला १०० कोटींच्या जवळ

दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट शुक्रवारी म्हणजेच ५ मे रोजी मोठ्या वादाच्या भोवऱ्यात प्रदर्शित झाला आहे.जेव्हापासून सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसत होता. मात्र ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात सुमारे ७.५० कोटींची कमाई करत सुरुवात केली. सुदिप्तो सेन दिग्दर्शित, द केरळ स्टोरी बॉक्स ऑफिसवर पैसा-स्पिनर ठरला. ५ मे २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. आणि तेव्हापासून हा चित्रपट थांबलेला नाही.

तिकीट खिडकीवर तो दर दिवसेंदिवस वाढतच आहे. ७ व्या दिवशी, अदा शर्माची भूमिका असलेल्या द केरळ स्टोरीने १२.५० कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या मते, सुरुवातीच्या अंदाजानुसार द केरळ स्टोरी ८ व्या दिवशी कोणतीही वाढ किंवा घट झाली नाही. तिने १२.५० कोटी रुपये कमावले, जे ७ व्या दिवसाच्या कलेक्शनप्रमाणेच होते. या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता ९४ कोटी रुपये झाले आहे. हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करेल. या चित्रपटात अदा शर्मासोबत योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांसारख्या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.

हे ही वाचा:

मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावणारा वैमानिक निलंबित; ३० लाखांचा दंड

खगोल भौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना जीवनरगौरव पुरस्कार

‘स्टारबक्स’च्या त्या नव्या जाहिरातीने ओढवला वाद; बहिष्कार ट्रेंडिंगमध्ये

फक्त राजीनामा नाही, ही चूक सुद्धा उद्धवना भोवणार!

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा केरळमधील महिलांचे सक्तीचे धर्मांतर आणि धार्मिक कट्टरतेवर आधारित आहे.मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट करमुक्त केल्याची घोषणा केली.त्यानंतर उत्तर प्रदेशमध्येही ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा करमुक्त करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’ ज्या वेगाने वाढत आहे ,ते लवकरच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’च्या आजीवन कलेक्शनचा टप्पा ओलांडणार आहे,ज्याने चित्रपटगृहांमध्ये केवळ १०७.७१ कोटी रुपयांची कमाई केली.

तसेच १२ मे रोजी द केरळ स्टोरी हा चित्रपट ३७ देशांमध्ये रिलीज झाला. विशेष म्हणजे विदेशात देखील प्रेक्षकांचे मोठे प्रेम हे द केरळ स्टोरी चित्रपटाला लाभले आहे. धमाकेदार कमाई करताना द केरळ स्टोरी चित्रपट दिसत आहे. ऑस्ट्रेलियामध्येही चित्रपटाचे ओपनिंग करण्यात आले.ऑस्ट्रेलियामध्ये द केरळ स्टोरी चित्रपटाने ओपनिंग डेलाच तब्बल ४४.७६ लाखांचे कलेक्शन केले आहे.त्यामुळे देशातच नाहीतर विदेशातही ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दणदणीत कमाई करताना दिसत आहे.

Exit mobile version