द काश्मीर फाइल्स, मी वसंतराव ऑस्करच्या यादीत

अधिकृत घोषणा २४ जानेवारीला

द काश्मीर फाइल्स, मी वसंतराव ऑस्करच्या यादीत

९५ व्या  ऑस्कर पुरस्कारांमध्ये  द काश्मीर फाइल्स, कांतारा ,आर आर आर, गंगुबाई काठियावाडी आणि छेल्लो शो यां चित्रपटांना ऑस्कर साठी नामांकन मिळाली आहेत. वर्षाच्या सुरवातीलाच चित्रपट विश्वासाठी खूप आनंदाची बातमी आहे. यावर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी दोन बॉलीवूड ,दोन दाक्षिणात्य चित्रपटांना तर एका गुजराती चित्रपटाला नामांकने मिळाली आहेत. नुकतीच चित्रपटांची अधिकृत यादी जाहीर झाल्यामुळे हि आनंदाची बातमी कळली आहे.

बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारा द काश्मीर फाइल्स , कांतारा, आणि आर आर आर चित्रपट, संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी , द रॉकेट्री नंबी इफेक्ट , मी वसंतराव आणि तुझ्या साठी काहीही हे मराठी चित्रपट , द नेक्स्ट मॉर्निंग , अनुप भंडारी यांचा विक्रांत रोना ,आणि द छे ल्लो शो एका गुजराती सिनेमाचा समावेश आहे. एकूण नऊ चित्रपटांचा ऑस्कर यादीत समावेश आहे.

हे ही वाचा:

जयंत पाटीलही आता टोमणे मारून घालवत आहेत वेळ!

घुसखोर चीनला ‘तिरंगी हेल्मेट्स’ ची चपराक

समाजवादी पार्टीचा प्रवक्ता पत्रकारांच्या कुटुंबियांवरही आक्षेपार्ह टिप्पणी करत होता!

भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरले

गेल्या काही वर्षांमध्ये यावर्षी आलेल्या नऊ चित्रपटांचं नामांकन हा भारतीय चित्रपट सृष्टीला चांगल्या आणि दर्जेदार कामाची पोचपावती म्हणावी लागेल.दिग्दर्शक भंडारी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ऑस्कर चित्रपट नामांकनाच्या यादीत समावेश होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, त्याचा पहिला चित्रपट रंगीतरंगा २०१५ मध्ये आला होता आणि २०१६ च्या ऑस्कर यादीत आला होता.

ऑस्कर साठीची पात्रता
यावर्षी हे ऑस्कर पुरस्कारांचे ९५ वे वर्ष आहे. एक जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान रिलीज झालेल्या आणि पात्रता फेरीत सलग सात दिवस चित्रपट चालणे गरजेचे असते. आणि चित्रपट ४० मिनिटांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ऑस्कर साठी एकूण ९५७९ पात्र सदस्य बारा ते सतरा जानेवारी दरम्यान मतदान करतील आणि अधिकृत घोषणा २४ जानेवारीला होईल. हॉलिवूड मध्ये बारा मार्च ला हा पुरस्कार सोहळा होणार आहे. तरी कुठला भारतीय सिनेमा ऑस्करमध्ये बाजी मारणार ह्याची संपूर्ण भारतीयांना उत्सुकता आहे.

Exit mobile version