तिसऱ्या कार्यकाळातील पहिली भेट इटलीला दिल्याचा आनंद

पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

तिसऱ्या कार्यकाळातील पहिली भेट इटलीला दिल्याचा आनंद

जी- ७ प्रगत अर्थव्यवस्थांच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी इटलीला रवाना झाले. ‘जी- ७ शिखर परिषदेसाठी सलग तिसऱ्या कार्यकाळात त्यांची पहिली भेट इटलीला दिल्याचा मला आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया इटलीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

‘पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून, मी १४ जून २०२४ रोजी जी ७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीमधील (अपुलिया) प्रदेशात जात आहे. मला आनंद आहे की सलग तिसऱ्या कार्यकाळात जी७ शिखर परिषदेसाठी माझी पहिली भेट इटलीला आहे,’ असे पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) प्रसिद्ध झालेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जी- ७ शिखर परिषदेत भारताचे लक्ष कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्य क्षेत्रावर असेल, असे निवेदनात म्हटले आहे. जी७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी २० शिखर परिषदेच्या परिणामांचा पाठपुरावा करण्याची संधी देईल, असे निवेदनात पुढे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांची इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय बैठक होणार आहे. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मेलोनी यांच्या गेल्या वर्षीच्या दोन भारतभेटी आमच्या द्विपक्षीय अजेंड्याला गती देण्यासाठी आणि हे नाते दृढ करण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या.’ ‘आम्ही भारत-इटली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक आणि भूमध्यसागरीय क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा..

‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या ऍडिशनल प्रोग्रॅम सेक्रेटरी पदी संजय ढवळीकर यांची नियुक्ती!

सरसंघचालकांचे खडे बोल, नेमके कोणासाठी?

दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर द्या: पंतप्रधानांच्या सूचना

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारसोबत चर्चेला तयार!

१३ ते १५ जून या कालावधीत इटलीच्या अपुलिया भागातील बोर्गो एग्नाझिया या लक्झरी रिसॉर्टमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत युक्रेनमधील चिघळलेले युद्ध आणि गाझामधील संघर्षाचे वर्चस्व यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, त्यांचे फ्रेंच समकक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे शिखर परिषदेत सहभागी होणारे प्रमुख नेते आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हेदेखील त्यांच्या देशावरील रशियन आक्रमणावरील सत्रासाठी नियोजित आहेत.

Exit mobile version