अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाल्यामुळे देशातील अनेक नागरिक देश सोडण्यासाठी धडपडत आहेत. तालिबानच्या भीतीने देश सोडलेले अनेक नागरिक इतर देशात आश्रयाला गेले असून त्या देशात ‘निर्वासित’ म्हणून राहत आहेत.
अफगाणिस्तानमधील एक मंत्रीही जर्मनीमध्ये वास्तव्यास असून त्यांना तिथे ‘फूड डिलिव्हरी’चे काम करावे लागत आहे.अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सय्यद अहमद शाह सआदत यांचा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. दोन वर्षे या पदाचा कारभार सांभाळून त्यांनी राजीनामा दिला होता. तालिबानचे वाढते वर्चस्व लक्षात घेता त्यांनी तेव्हा देश सोडला होता. सय्यद अहमद शाह सआदत हे सध्या जर्मनीमधील लेपझिगमध्ये सामान्य कामगारासारखे जीवन जगत आहेत.
हे ही वाचा:
प्रतीक कर्पेंचा सरदेसाईंवर पलटवार
मध्य रेल्वेने केला ऑलिम्पियन महिला हॉकीपटूंचा गौरव
अरेरे! नवरा गेला, चिमुरड्यांचीही तिने केली हत्या
मंदिर हम खुलवायेंगे…भाजपचा नारा
जर्मनीत आल्यानंतर सय्यद यांच्याकडे पैसे होते आणि त्यातून त्यांचे कुटुंब चालत होते, पण काही काळानंतर जवळचे पैसे संपले. दरम्यान, त्यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्यांसाठी अर्जही केले पण अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर, त्यांनी पिझ्झा आणि इतर फूड डिलिव्हरी सुरू केली आणि आता याद्वारे त्याच्या कुटुंबाचा खर्च भागवत आहेत. आता ते आपल्या सायकलवर घरोघरी जाऊन अन्न पोहोचवतात.
अफगाणिस्तानचे माजी मंत्री असलेले सय्यद अहमद शाह सआदत यांच्याकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या दोन पदवीव्युत्तर पदव्या आहेत. यातील एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमधील आहे, तर दुसरी पदवी ही कम्युनिकेशन्समधील आहे. सआदत यांनी १३ देशातील २० हून अधिक माहिती प्रसारणाशी संबंधित कंपनीत काम केले आहे. या क्षेत्रात २३ वर्ष काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. ग्राहकाला पिझ्झा देण्यासाठी जात असताना एका स्थानिक पत्रकाराने त्यांचे छायाचित्र टिपले होते आणि समाज माध्यमांवर ते चांगलेच व्हायरल झाले आहे. ‘स्काय न्यूज अरेबिया’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सआदत यांनी छायाचित्र त्यांचेच असल्याचे मान्य केले.