हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पॅलिस्टाइनच्या परिसरात होणारे मृत्यू आणि नुकसान कमी करण्यासाठी इस्रायलला शक्य ते सर्व प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे नमूद केले आहे. मात्र इस्रायलने या निर्णयावर टीका केली आहे. हा निर्णय अपमानास्पद आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही गरजेचे आहे, ते केले जाईल, असा निर्धार इस्रायलने व्यक्त केला आहे.
दक्षिण आफ्रिकेने गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्याला नरसंहार असे संबोधून न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, हे हल्ले तातडीने रोखावेत, अशी मागणी केली होती. त्यावर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत. आमच्या देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी जी काही आवश्यक पावले असतील ती आम्ही उचलू, प्रत्येक देशासारखे इस्रायललाही आपल्या अखंडतेचे संरक्षण करण्याचा मूलभूत अधिकार आहे. इस्रायल पॅलिस्टॅनींविरोधात नरसंहार करतो आहे, हा दावा चुकीचा व अपमानास्पद आहे,’ असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला आठ कोटी ३३ लाख डॉलर देण्याचे डोनाल्ड ट्रम्पना आदेश
बंगालमधील राहुल गांधी यांच्या यात्रेला परवानगी नाही
सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे
जरांगे म्हणतात आमचा विरोध संपला; आरक्षणाबाबत सरकारकडे अध्यादेश तयार
सुनावणीदरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयात दक्षिण आफ्रिकेच्या वकील अदिला हासिम यांनी गेल्या १३ आठवड्यांतील पुरावे सादर केले. ‘गाझामधील नागरिक पीडित आहेत. गाझाच्या नागरिकांचे दुःख केवळ न्यायालयाचा आदेशच थांबवू शकतो,’ अशा शब्दांत हासिम यांनी न्यायालयाला साकडे घातले होते. तर, सुनावणीदरम्यान नेतान्याहू यांनी व्हिडीओच्या माध्यमातून इस्रायलची बाजू मांडली. ‘इस्रायलवर नरसंहाराचा आरोप केला जात आहे, उलट इस्रायलच नरसंहाराशी लढतो आहे. दक्षिण आफ्रिकेचे हे थोतांड आहे,’ असा आरोप नेतान्याहू यांनी केला होता.