अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात एक कंटेनर जहाज ब्रिजला धडकून मोठा अपघात झाला होता. बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला जहाज धडकल्यानंतर ब्रिज कोसळला होता. या जहाजावर भारतीय क्रू मेम्बर्स असल्याचे समोर आले होते. या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे. जहाजामध्ये तांत्रिक बिघाड होऊन नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. आता धडकलेल्या कंटेनर जहाजावरील २० भारतीय आणि एक श्रीलंकन हे या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत जहाजावर राहणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. जहाजाचे मालक असलेल्या ग्रेस ओशन पीटीईच्या प्रवक्त्याने सांगितले की, क्रू मेंबर्स हे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि कोस्ट गार्डला त्यांच्या तपासत सहकार्य करत आहेत.
या जहाजावरील क्रू मेम्बर्सला किती वेळ तिथे राहावे लागेल याबद्दल कोणतीही टाइमलाइन प्रवक्त्यांनी दिलेली नाही. या क्षणी तपास प्रक्रियेला किती वेळ लागेल याची काहीच कल्पना नसल्याचे प्रवक्त्याने सांगितले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी जहाजावरील चालक दलातील सदस्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. शिवाय तपासणीचा भाग म्हणून कागदपत्रे आणि डेटा रेकॉर्डरचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या प्रमुख जेनिफर होमेंडी यांनी सांगितले की, या अपघातग्रस्त मालवाहू जहाजात मोठ्या प्रमाणात घातक आणि ज्वलनशील पदार्थ होते. २६ मार्क रोजी ९८४ फूट मालवाहू जहाज हे कोलंबो, श्रीलंकेला जात होते. हा अपघात झाला तेव्हा पुलावरील खड्डे दुरुस्त करणाऱ्या सहा बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत दोनच मृतदेह सापडले आहेत.
हे ही वाचा:
हिंदू रिक्षा चालकावर जमावाचा हल्ला
अरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी
‘मॉस्को हल्ल्याशी संबंध असल्याचा रशियाचा आरोप धादांत खोटा’
मविआमध्ये एकोपा नाही; प्रकाश आंबेडकरांचा घाणाघात
अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांच्या आसपास हा अपघात झाला होता. या ब्रिजच्या एका खांबाला जहाजाची जोरदार धडक बसल्यानंतर काही सेकंदामध्येच ब्रिज कोसळला. १.६ मैल, चार पदरी पूल पॅटापस्को नदीवर उभारण्यात आला आहे. बाल्टिमोर बंदरासाठी हा अत्यंत महत्त्वाचा ब्रिज मानला जातो.