चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे

भारत आणि चीन सीमाभागात गेल्या अनेक महिन्यांपासून तणाव होता. मात्र, आता हा तणाव निवळण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पीआयबीने दिली आहे.

चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे

भारत आणि चीन सीमाभागात गेल्या अनेक महिन्यांपासून तणाव होता. मात्र, आता हा तणाव निवळण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती प्रेस इन्फोर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीने दिली आहे. पूर्व लडाखच्या भागातून दोन्ही देशाच्या सैन्याने माघारी परतण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.

“भारत चायना कॉर्प्स कमांडर India China Corps Commander स्तरीय बैठकीच्या १६ व्या फेरीत झालेल्या सहमतीनुसार, ८ सप्टेंबर २०२२ रोजी, गोगरा- हॉटस्प्रिंग्स (PP-15) परिसरातून भारतीय आणि चिनी सैन्याने पीछेहाट करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित राहील,” असं संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे.

जुलै महिन्यात दोन्ही सैन्यदलात १६ व्या चर्चेची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर दोन्ही देशांकडून एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले होते. त्यात लिहिले होते की दोन्ही देशांकडून पश्चिमी क्षेत्रात जमिनीवर सुरक्षा आणि स्थिरता निर्माण व्हावी, यासाठी सहमती झाली आहे.

हे ही वाचा:

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा

याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

७० वर्षांच्या काळात १८ भारतीय पंतप्रधानांना भेटल्या राणी एलिझाबेथ

अबब!! एलिझाबेथ यांची इतकी संपत्ती मिळणार वारसांना

उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाई सहयोग संघटनेच्या शिखर संमलेनापूर्वी दोन्ही देशांनी हे पाऊल उचलले आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सहभागी होणार असून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते आमनेसामने येणार आहेत.

Exit mobile version