23 C
Mumbai
Friday, November 29, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करत असल्याचा ‘द गार्डियन’चा भारतावर आरोप

पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करत असल्याचा ‘द गार्डियन’चा भारतावर आरोप

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अहवाल फेटाळला

Google News Follow

Related

ब्रिटनचे दैनिक ‘द गार्डियन’ने भारतावर अजब आरोप केला आहे. भारतविरोधी कारवाई करणाऱ्यांवर परदेशात हत्या आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, भारताने इस्राइलची गुप्तचर संस्था मोसाद आणि रशियाच्या केजीबीपासून प्रेरणा घेतली आहे, जे परदेशी भूमीवर शत्रूंना मारण्यासाठी ओळखले जातात असेही म्हटले आहे. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाल फेटाळला आहे. तसेच त्यांना खोटा आणि दुर्भावनापूर्ण प्रचार असे म्हटले आहे.

‘द गार्डियन’मधील अहवालात भारत आणि पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांचा हवाला देऊन दावा केला आहे की, भारताचे पाऊल हे परदेशी भूमीवर राहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहे. मात्र त्यांनी केलेले आरोप खोटे आणि द्वेषपूर्ण भारतविरोधी प्रचार करण्यासाठी आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने ‘द गार्डियन’ला ठणकावून सांगितले आहे. या अहवालाला उत्तर देताना मंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे पूर्वी केलेले विधान अधोरेखित केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले होते की, इतर देशांमध्ये लक्ष्य करून हत्या करणे हे भारत सरकारचे धोरण नाही.

‘द गार्डियन’च्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, नवी दिल्लीने म्हणजेच भारताने त्यांच्याशी शत्रुत्व असणाऱ्यांना लक्ष्य करण्याचे धोरण राबवले आहे. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यापासून भारतीय गुप्तचर एजन्सी RAW ने अशा सुमारे २० हत्या केल्या आहेत. हा अहवाल पाकिस्तानने दिलेले पुरावे आणि सीमेच्या दोन्ही बाजूंच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मुलाखतींवर आधारित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गार्डियनने एका अज्ञात भारतीय अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, भारताने इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद आणि रशियाच्या केजीबीपासून प्रेरणा घेतली आहे, जे परदेशी भूमीवर शत्रूंना मारण्यासाठी ओळखले जातात.

२०१९ मध्ये जम्मूमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. यात ४० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर २०२३ मध्ये पाकिस्तानात लक्ष्य करून करण्यात आलेल्या हत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे यामागे भारताचा हात असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, भारताने हे आरोप आणि दावे फेटाळून लावले आहेत.

याआधी अमेरिका आणि कॅनडाने भारतावर परदेशी भूमीवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र, भारताने हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत. कॅनडालाही आरोपांबाबत पुरावे देण्यास सांगितले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दावा केला होता की, खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे आरोप केले आहेत.

हे ही वाचा:

भाजपच्या स्थापनादिनी एक लाखांहून अधिक लोक पक्षात सामील होणार!

अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर करून दाखवलं!

काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!

दरम्यान, अमेरिकेने असा दावा केला होता की, त्यांनी आणखी एक खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नून यांच्या हत्येचा प्रयत्न हाणून पाडला होता. पन्नून हा अमेरिकन-कॅनडियन नागरिक होता ज्याची हत्या करण्याचा कट भारतीय नागरिक निखिल गुप्ता आणि एका अज्ञात भारतीय सरकारी अधिकाऱ्याने रचला होता, असा आरोप अमेरिकेने केला होता.

गार्डियनच्या प्रकाशनात चुका

डाव्या विचारसरणीच्या ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’मध्ये हन्ना एलिस- पीटरसन, आकाश हसन आणि शाह मीर बलोच यांनी केलेल्या अहवालात तथ्यात्मक त्रुटी होत्या. ‘द गार्डियन’ चुकीच्या माहितीच्या विरोधात असल्याचा दावा करत असताना, त्यांच्या अहवालात अनेक ठिकाणी चुकीची माहिती असल्याचे समोर आले आहे. खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू मरण पावला आहे, असे या अहवालात म्हटले आहे. मात्र, हा खलिस्तानी दहशतवादी जिवंत असून धमक्या देत आहे. भारतीय वाचकांनी ही चूक दाखवून देताच गार्डियनने ही चूक सुधारली आहे.

गार्डियनच्या लेखात चुकीच्या दहशतवाद्याचे चित्र वापरून भारतीय गुप्तचरांनी त्याला पाकिस्तानमध्ये ठार मारल्याचा दावा करण्यात आला होता. ४ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी रियाझ अहमदचे चित्र रियाझ अहमद उर्फ अबू कासिमसाठी वापरले. त्यावेळीही भारतीय वाचकांनी ‘द गार्डियन’ला त्यांच्या चुकीच्या पत्रकारितेसाठी संपर्क करताच प्रकाशनाने रियाझ अहमदचे चित्र काढून टाकले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
202,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा