23 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरदेश दुनियाअमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख

अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख

Google News Follow

Related

माईक हा अमेरिकेमधील न्यूयॉर्कवरील हल्ल्यानंतर लष्करात भरती झाला होता. काही काळानंतर त्याला अफगाणिस्तानच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. उत्तर अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ येथील काला-ए-जंगी या किल्ल्यातील तुरुंगात तालिबानी कैद्यांच्या उद्रेकात तो मारला गेला. अफगाणिस्तानमध्ये मारला गेलेला तो अमेरिकेचा पहिला सैनिक होता. सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर त्याच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेचे सैन्य माघारी परतत असताना अफगाणिस्तानमध्ये झालेला शेवट लाजीरवाणा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अफगाणिस्तानमधील गोंधळाच्या परिस्थितीचे फोटो पाहून खूप त्रास होतो. विमानाला लटकलेले काही लोक पडले. ते पाहून विमाने धडकल्यानंतर आमच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीमधून उड्या मारणाऱ्या देशबांधवांची आठवण झाली, असे माईकचे वडील जॉनी म्हणाले.

हे ही वाचा:

तालिबानचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे

शिवसैनिकांनी केली ‘या’ नेत्यावर दगडफेक

अफगाण फुटबॉलपटूचा ‘असा’ झाला मृत्यू

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दूरसंचार क्षेत्राला होणार फायदा

सैन्य काढून घेण्यास त्यांचा विरोध नाही. मात्र त्यासाठीची वेळ आणि पद्धतीविषयी त्यांनी प्रतिकूल मत व्यक्त केले. अफगाणवासी मरणार आहेत. तालिबानी त्यांना मारून टाकतील. आपण अफगाण जनतेला वाचन दिले असताना त्यांची अशी अवस्था होणे कसे सहन होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जॉनी म्हणाले की, शेवटच्या काही वेळी माईकशी संवाद साधता आला. त्यावेळी न्यूयॉर्कच्या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा याच्या ठावठीकाण्याविषयी माहिती काढण्याबाबत माईक आशावादी होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा