पुढील जुलैमध्ये खुला होणार काचेचा झुलता पूल

पुढील जुलैमध्ये खुला होणार काचेचा झुलता पूल

अमरावतीतील चिखलदरा हिल स्टेशन पुढील जुलैमध्ये विशेष आकर्षण ठरणार आहे. कारण जगातील पहिला दोरीचा झुलता पूल सुरु होणार आहे. हा काचेचा स्कायवॉक ४०७ मीटर लांबीचा ज्यावर मधल्या भागावर १०० मीटर काचेचा भाग असेल आणि ५९० फूट खोल दरीवर उभारण्यात आला आहे.

हा स्कायवॉक बनवण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हा काचेचा स्कायवॉक जगातील पहिला दोरीचा झुलता पूल असणार आहे. या प्रकल्पाचे अभियंता सिडकोचे कार्यकारी देवेंद्र जमणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्लासवॉक कदाचित स्वित्झर्लंडमधील आणि चीनच्या स्कायवॉकपेक्षा मोठा आहे. या झुलत्या पुलाचे काम ऑक्टोबर २०१९ मध्ये सुरु झाले होते त्यांनंतर पुढील जुलैपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो.

सिडकोने या झुलत्या पुलाच्या प्रकल्पाचे कंत्राट एपिकॉन कन्स्ट्रक्शनला दिले आहे. ज्याने २०१९ मध्ये काम सुरू केले होते. या पुलाचा मधला भाग १०० मीटर काचेचा भाग असेल. एअर पास-इन सक्षम करण्यासाठी स्टील प्लेट्स लावलेल्या असणार आहेत. तर स्कायवॉकच्या दोन्ही बाजूला साखळी लिंक फेन्सिंग असणार आहे. पुलाचे वजन टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही बाजूला मोठे खांब आहेत. हा काचेचा पूल १९० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा सामना करण्यास सक्षम असणार आहे. तब्बल ३५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलावर उत्तम कलाकृती असणार आह. १०० मीटर लांबीचा काचेचा मजला असलेला हा जगातील पहिला सिंगल-रोप सस्पेन्शन ब्रिज असेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

हे ही वाचा:

सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर

ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण

“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”

नातवंडे द्या, नाहीतर पाच कोटी भरपाई द्या; न्यायालयात केला अजब दावा

दरम्यान, चिखलदरा, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील एकमेव हिल स्टेशन, मुंबई-नागपूर एक्सप्रेसवे जवळ असल्याने या प्रकल्पात पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन आणि रोजगार वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे.

Exit mobile version