देशातील पहिली खासगी रेल्वे शिर्डीत दाखल

देशातील पहिली खासगी रेल्वे शिर्डीत दाखल

भारत गौरव योजनेंतर्गत देशातील पहिली खासगी प्रवासी रेल्वे गुरुवार,१६ जून रोजी शिर्डीत दाखल झाली आहे. या रेल्वेला मंगळवारी कोईम्बतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. आज सकाळी साडे सहा वाजता ही रेल्वे शिर्डीमध्ये दाखल झाली आहे.

भारतीय रेल्वेसेवेअंतर्गत खासगी रेल्वे प्रथमच देशात धावली आहे. या रेल्वेला एकूण वीस डब्बे आहेत. तर त्या रेल्वेमध्ये प्रवाशांची क्षमता दीड हजारापर्यंत आहे. तसेच ही रेल्वे महिन्यातून तीनदा धावणार आहे. आज धावलेल्या या रेल्वेमध्ये एकूण ८१० प्रवाशांनी प्रवास केला आहे. तसेच या केंद्र सरकारच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला तर येणाऱ्या काळात आणखी खासगी रेल्वे देशात येऊ शकतात.

हे ही वाचा:

१८ तास चौकशीनंतर राहुल गांधींची आज पुन्हा चौकशी

आयपीएल मीडिया राईट्सच्या लिलावातून बीसीसीआयने कमावले इतके रुपये

LIC SHARE का गडगडतोय ?

सोलोमन बेटांवरून चीनची नजर ऑस्ट्रेलियावर!

दरम्यान, रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला दोन वर्षांसाठी कराराने दिली आहे. ही ट्रेन चालविणार्‍या कंपनीने कोचमध्ये नूतनीकरण केले आहे. ही रेल्वे महिन्याला किमान तीन धावणार आहे. यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण २० डबे आहेत. ट्रेनची देखभाल हाऊसकीपिंग सर्विस प्रोवाइडर्सद्वारे केली जाईल. ट्रेनमध्ये शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून, रेल्वे पोलिस दलासह रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर, खासगी सुरक्षा कर्मचारी असतील.

Exit mobile version