पहिल्या टप्प्यातील समृद्धीचा महामार्ग दिसू लागला

पहिल्या टप्प्यातील समृद्धीचा महामार्ग दिसू लागला

मुंबई ते नागपूर रस्ते प्रवास वेगवान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला. कोरोनाकाळात मंदावलेल्या या रस्त्याच्या कामाला पुन्हा एकदा वेग देण्यात आला आहे. ७०१ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करून पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे.

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. तर या प्रकल्पातील ५२० किलोमीटरच्या नागपूर ते शिर्डी मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या पहिल्या टप्प्याचे उर्वरित काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून ५२० किलोमीटरचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली होती. महत्त्वाकांक्षी मानला जाणारा या प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!

सुरुवातीला शेतकरी, स्थानिक लोकांचा विरोध आणि भू संपादन अशा कारणांमुळे प्रकल्पाचे काम संथ गतीनेच सुरू झाले होते. या अडचणींवर मात करून प्रकल्पाच्या कामाला वेग येत होताच की कोरोनाच्या पहिल्या लाटेने २०२० मध्ये देशात प्रवेश केला आणि त्याचा फटका या प्रकल्पालाही बसला. मजुरांची संख्या घटली आणि २०२० मध्ये सुरू होणारा पहिला टप्पा अजूनही सुरू झालेला नाही.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर १ मे २०२१ ला पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पहिला टप्पा सुरू करण्याचे काम पुन्हा पुढे गेले. पण आता मात्र पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचा विचार आहे त्यामुळेच कामाला गती देण्यात आली आहे.

५२० किलोमीटर पैकी ४५० किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून मार्गावरील सोयीसुविधा विकसित करण्याच्या कामाला सुरवात होणार आहे. नोव्हेंबरपर्यंत काम पोर्र्ण करून डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे.

७०१ किलोमीटर लांबीचा या प्रकल्पात आठ मार्गिका असून १० जिल्हे आणि ३९० गावे या मार्गावरून जोडली जाणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ११ लाख झाडे तर दुभाजकावर २२ लाख रोपटी लावण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मार्गाच्या दोन्ही बाजूस २.४ मीटर उंचीची भिंत उभारण्यात येणार आहे आणि त्यावर ९० सेमीचे तारेचे कुंपण असणार आहे.

Exit mobile version