24 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरदेश दुनियाप्रसिद्ध रॅपर कॉन्सर्टदरम्यानच कोसळला

प्रसिद्ध रॅपर कॉन्सर्टदरम्यानच कोसळला

लाईव्ह शोमध्ये घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

रॅपर आणि लोकप्रिय गायक कोस्टा टिच याचे कॉन्सर्ट दरम्यान निधन झाले आहे. गाणे गात असतानाच कोस्टा मंचावर कोसळून त्याचा  मृत्यू  झाला आहे. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचा अखेर  घटनांचा व्हिडिओ बघून त्याचे चाहते भावुक झाले आहेत. जोहान्सबर्ग येथे अल्ट्रा म्युझिक फेस्टिवल मध्ये तो परफॉर्म करत होता. त्याचे गाणे तो गात असतांनाच तो खाली स्टेजवर कोसळला. त्याच्या गाण्याचा शेवटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

व्हायरल झालेल्या या व्हिडियो मध्ये कोस्टा गाणे गात असून सर्व उपस्थित लोक आजूबाजूला नाचत आहेत. यामध्ये कोस्टा हा अचानक खाली पडतो तेव्हा जमलेले लोक त्याला पुन्हा उभे करतात. पण दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा कोसळला आहे.
कोस्टा  टिच  हा दक्षिण आफ्रिकेतील लोकप्रिय रॅपर आणि गीतकार होता. वयाच्या १५ व्या वर्षांपासून त्याने नृत्यामध्ये करिअर करण्याचाच विचार केला होता. नृत्य आणि सांगीत हि त्याची आवड होती. जोहान्सबर्ग येथील ‘न्यू एज स्टीझ’ या डान्स ग्रुपमध्ये देखील त्याचा सहभाग होता. अनेक आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा त्याने गाजवल्या होत्या. त्याला नंतर संगीताची विशेष गोडी लागल्यामुळे त्याने संगीतक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली.  दरम्यान, कोस्टा टीचच्या जाण्याने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर त्याचा  मोठा चाहतावर्ग आहे. यूट्यूबवरील त्याच्या गाण्यांना ४५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेत ‘भारतीयांना’ आता सहज ‘व्हिसा’ मिळणार

१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….

धावत्या रिक्षावर १७व्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड आणि…

‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

कोण आहे कोस्टा टीच ?

कोस्टा टीच याचे खरे नाव कोस्टा त्सोबानोग्लू असं आहे. पण कोस्टा टीच याच नावाने तो जास्त लोकप्रिय होता. त्याचा जन्म १९९५ ला दक्षिण आफ्रिकेतील नेलस्प्रूट येथे झाला. त्याची ‘ऍक्टिवेट’ आणि ‘नकलकथा’ हि गाणी खूपच लोकप्रिय झाली. हॉलीवूडचा गायक एकॉन सोबतच त्याचे एक रिमिक्स गाणे नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा