टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सर्वात जास्त अपेक्षा ही नेमबाजांकडून होती, पण त्यांनी निराशा केली. नेमबाजीत भारताला सपशेल अपयश आले. सलग दुसऱ्या वर्षी नेमबाज रिकाम्या हातांनी परतले आहेत याची दखल घेत उच्च श्रेणीतील व्यक्तीकडून त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल.
या प्रकरणी भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या अधिकाऱ्यांचीही समीक्षा होईल. समीक्षा प्रक्रिया सुरू झाली असून ती तीन भागात केली जाईल. पहिले खेळाडू, नंतर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ, त्यानंतर राष्ट्रीय महासंघाच्या अधिकाऱ्यांची समीक्षा केली जाईल. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे (एनआरएआय) अध्यक्ष रानिंदर सिंग यांचेही मूल्यमापन होणार का असे विचारल्यास सूत्राने सकारात्मक प्रतिसाद दिला. महासंघाचे प्रमुख स्वतः यासठी राजी आहेत अशीही माहिती सूत्राकडून मिळाली.
हे ही वाचा:
एनसीबीच्या समीर वानखेडेंचे केंद्राने का केले कौतुक?
…तरच गाड्यांना परवाने द्या! कोर्टाने सुनावले…वाचा
सायन- पनवेल मार्गावर म्हणून आहे अंधार!
संसदेतल्या गोंधळाचे ‘पोस्टमॉर्टम’! वाचा काय घडले
महासंघांच्या अधिकाऱ्यांचे मूल्यमापन योग्य व्यक्ती करेल. ऑलिम्पिक तयारीसाठी महासंघ कुठे कमी पडला अशा सर्व बाबींवर समीक्षा केली जाईल. महासंघाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे मुल्यांकन होण्यापूर्वी एनआरएआय स्वतः नेमबाज, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांचे पुनरावलोकन करणार आहे. ऑलिम्पिकमधील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महासंघ रचनेत आमूलाग्र बदल करण्याचा हेतू बाळगून आहे.
युवा पिस्तुल नेमबाज मनू भाकर आणि तिचे माजी प्रशिक्षक जसपाल राणा यांच्यातील वादामुळे संघावर त्याचा परिणाम झाला. अध्यक्ष स्वतः नाराज आहेत. टोकियोत अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्यास स्पर्धेनंतर कामगिरीचे पोस्टमार्टम करण्याचे आश्वासन रानिंदर यांनी दिले होते.