हमासचा म्होरक्या सिनवरच्या खोपडीचा इस्रायलने घेतला वेध

इस्रायची सेना आयडीएफने दिली माहिती

हमासचा म्होरक्या सिनवरच्या खोपडीचा इस्रायलने घेतला वेध

गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असून दुसरीकडे लेबनॉनस्थित हिजबुल्ला दहशतवादी गटानेही इस्रायल विरोधात आघाडी उघडली आहे. त्यामुळे इस्रायलकडून अनेक आघाड्यांविरोधात लढण्याचे काम सुरू आहे. इस्रायलकडून या दोन्ही गटांच्या म्होरक्यांचा खात्मा केला जात आहे. अशातच हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायची सेना आयडीएफने दिली आहे. तसंच, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे.

सर्वात प्रथम ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागून हल्ला केला होता. याह्या सिनवार हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता, अशी माहिती आहे. दरम्यान, गुरुवारी इस्रायलने दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरात हल्ला केला. या हल्ल्यात तीन दहशतावाद्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यापैकी एक याह्या सिनवार होता. इस्रायलने हवाई हल्ला केल्यानंतर तीन दहशतवादी ठार केल्याची माहिती सुरुवातीला दिली होती. परंतु, याह्या सिनवार याच्या मृत्युच्या वृत्ताला दुजोरा दिलं नव्हतो. यानंतर रात्री उशिरा आयडीएफनेच सिनवार याच्या मृत्यूबाबत माहिती दिली. याह्या सिनवार मारला गेला, असं आयडीएफने सांगितलं. तसेच, “७ ऑक्टोबरच्या नरसंहार आणि अत्याचाराला जबाबदार असलेला खूनी याह्या सिनवारला आयडीएफच्या सैनिकांनी ठार मारले,” असं इस्रायलचे परराष्ट्र मंत्री कॅटझ यांनी एका निवेदनात म्हटले.

हे ही वाचा:

राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची हत्या एसआरएच्या वादातूनच ?

सिद्धरामय्यांनी आता राजीनामा द्यावा

बहराइच हत्येतील आरोपी सर्फराज, तालिबला पायावर मारल्या गोळ्या

झाकीर नाईकच्या व्हिडीओंनी प्रभावित होऊन सलमानने मुथ्यालम्मा मंदिरात केली तोडफोड

झाकीर नाईक भारतातून पळालेला नमुना…पाकिस्तानी पत्रकाराने काढली लायकी

“याह्या सिनवार याच्या मृत्यूमुळे मध्यपूर्वेत आता शांतता प्रस्थापित होईल. परंतु गाझामधील युद्ध संपलेलं नाही. ओलिस इस्रायलमध्ये परत येत नाहीत, तोवर युद्ध सुरूच राहील”, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी दिला आहे.

Exit mobile version