28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरदेश दुनियाताब्यात घेतलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देणार

ताब्यात घेतलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देणार

एस जयशंकर यांनी केलेल्या चर्चेनंतर इराणने स्पष्ट केली भूमिका

Google News Follow

Related

इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण असून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अशातच इस्रायली नागरिकाच्या मालकीचे जहाज इराणने होर्मुझच्या आखातात ताब्यात घेतले असून त्यावर १७ भारतीय कर्मचारी आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताने इराणशी द्विपक्षीय स्तरावर बोलणी सुरू केली आहेत. यासंबंधित अपडेट समोर आले आहेत.

इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्लाहियान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सांगितले की. तेहरान लवकरच भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणी सैन्याने ताब्यात घेतलेल्या एमएससी एरीज या मालवाहू जहाजावर असलेल्या १७ भारतीय क्रू सदस्यांना भेटण्याची परवानगी देईल.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जयशंकर यांनी त्यांच्या इराणी समकक्षांशी फोन कॉलमध्ये एमएससी एरीजवरील १७ भारतीय क्रू मेंबर्सच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि या संदर्भात तेहरानला मदतीची विनंती केली. प्रत्युत्तरात, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की त्यांचे सरकार जप्त केलेल्या मालवाहू जहाजाशी संबंधित तपशीलांचा पाठपुरावा करत आहे. ते म्हणाले की भारत सरकारचे प्रतिनिधी क्रूसोबत भेटण्याची शक्यता लवकरच प्रदान केली जाईल.

हे ही वाचा:

इस्रायल-इराण संघर्षाबद्दल भारताने व्यक्त केली तीव्र चिंता!

सरबजीत यांचा मारेकरी मारला गेला, मात्र न्याय मिळाला नसल्याची मुलीची खंत

रामनवमीसाठी अयोध्येतील राम मंदिरात प्रसादासाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

इस्रायलने काही दिवसांपूर्वी सिरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता. त्यात इराणच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्याचवेळी इस्रायलने मात्र या हल्ल्यातील आपला सहभाग नाकारला होता. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढला असताना इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डने एमएससी एरीज हे होर्मुझमधून जाणारे जहाज शनिवारी ताब्यात घेतले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा