29 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामारोममधील कोलोजियमच्या भिंतीवर नाव लिहिणाऱ्या जोडप्याची ओळख पटली

रोममधील कोलोजियमच्या भिंतीवर नाव लिहिणाऱ्या जोडप्याची ओळख पटली

पोलिसांनी पाठवली नोटीस

Google News Follow

Related

रोममधील प्राचीन अशा कोलोजिअम वास्तूवर एका जोडप्याने स्वत:चे नाव लिहिले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण इटलीमध्ये खळबळ माजली होती. सुमारे दोन हजार वर्षे जुन्या असणाऱ्या या वास्तूच्या भिंतीवर नाव लिहिल्यामुळे सगळीकडून संताप व्यक्त होत होता. आता या नाव कोरणाऱ्याची ओळख पटली आहे. हे जोडपे पकडले गेले नसले तरी त्यांची ओळख पटली आहे.

यातील पुरुष ब्रिटनमध्ये फिटनेस ट्रेनर आहे. फोटोग्राफिक कम्पॅरिझनचा वापर करून या पुरुषाची ओळख पटवण्यात आली आहे. हे जोडपे ब्रिटनचे रहिवासी आहेत. स्थानिक वृत्तपत्राने त्याचे नाव इवान दमित्रोव असे लिहिले आहे. तो २७ वर्षांचा आहे. तो मूळ बल्गेरियाचा असून सध्या त्याचे वास्तव्य ब्रिस्टलमध्ये आहे. तो या दोन हजार वर्षे जुन्या भिंतीवर स्वत:चे आणि त्याच्या मैत्रिणीचे नाव लिहीत होता. त्याने ‘Ivan+ Hayley 23’ असे नाव लिहिले. त्यासाठी त्याने चावीने भिंतीवर नाव कोरले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हे पाहून संताप व्यक्त केला आणि त्याचे चित्रण केले. त्यानंतर त्याने हे चित्रिकरण यूट्युबवर अपलोड केले. त्यामुळे हे चित्रिकरण लगेचच व्हायरल झाले.

हे ही वाचा:

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार यांची निवड?

इंदूर धुळे मार्गावर ट्रक हॉटेलमध्ये घुसला; ७ ठार

भारतात मुस्लिम पर्सनल लॉ हवा तर मग अमेरिका, ब्रिटनमध्ये तशी मागणी का केली जात नाही?

द्योगपती अनिल अंबानींच्या पत्नी टीना यांची ईडी चौकशी

इटलीच्या पोलिसांनी या संशयिताला त्याच्या ब्रिटनच्या घरी नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत त्याची चौकशी केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. जर या ऐतिहासिक वास्तूचे नुकसान करण्याच्या प्रकरणात तो दोषी आढळला तर, त्याला १५ हजार युरो (सुमारे १३ लाख रुपये) दंड भरावा लागेल. तसेच, पाच वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागेल. रोममधील या कोलोजियम वास्तूचा वास्तूवारसा स्थळामध्ये समावेश होतो. या वास्तूमध्ये तलवारबाजी, प्राण्यांशी युद्ध खेळली जात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा