बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुखद

बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित  ई बस सेवा  पुढील आठवड्यात सुरु

नेहमीच कोणतीही पहिली गोष्ट  काहीही असले तर आपल्याला त्याचे अप्रूप असते हे  अशासाठी सांगतोय कारण  संपूर्ण देशातील पहिली वाहिली बहुप्रतीक्षित डबलडेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु करण्यात येणार आहेत. त्यापुढे पुढील आठवड्यात आणखी पाच बस सुरु करणार आहेत. तर मार्च अखेर शहरांतील विविध मार्गावर एकूण २०० एसी ई डबल डेकर बस सुरु करण्याचा विचार करत आहेत. हि बस संपूर्ण बॅटरीवर धावणार असून वातानुकूलित असणाऱ्या या बसला दोन दरवाजे असणार आहेत. कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गावरून या बसचा आधी प्रवास असणार आहे. मुंबईकरांची आवडती असणारी डबलडेकर बस सध्या अत्यंत दुर्मिळ झाल्या आहेत.  त्यामुळे वातानुकूलित असणारी हि डबलडेकर ई बसचे सगळ्यांना आकर्षण असणार आहे.

हि मुंबईकरांची आवडती बस अत्याधुनिक इलेक्ट्रिक अवतारांत मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे. पुढील आठवड्यात या बसचा अधिकृत प्रवास सुरु होणार आहे. त्याची सुरवात सांताक्रूझ ते कुर्ला यामार्गाची होणार आहे. या डबल डेकर ई बसची एकावेळेस ७८ प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असून या बसच्या दोन्ही बाजूंना दरवाजे असणार आहेत. मुंबईतील प्रवांशांची गर्दी बघता खास गर्दीचा त्रास टाळण्यासाठीच हि बस असल्याचे कळते.

बस कोठे कोठे धावणार?
डबल डेकर ई बस आता कुलाबा डेपो, मजसी डेपो, कुर्ला डेपो, अशा डेपोंवर धावणार आहे. या बसेस बॅच प्रमाणे मिळणार असून त्या मुंबईतील रस्त्यांवर आधीच्या डबल डेकर बसप्रमाणे धावतील. ह्या बस धावण्यासाठी प्रत्येक बस डेपोंमध्ये ई बस कार्यान्वित करण्यापूर्वी चार्जिंग पॉईंट्स स्थापित करण्याची प्रक्रिया चालू आहे.  २०२३-२४ या आर्थिक वर्षांत मुंबई शहरात बेस्टचे सुमारे ४,००० ई बसेस सुरु करण्याचा विचार चालू असून , पाच बस डेपोंमध्ये ई चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर एकूण २७ बस डेपोंमध्ये बस ई चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा तैयार करण्यात येतील.

हे ही वाचा:

आता चिल्लर घ्यायला एटीएममध्ये जा!

नाणार होणार, ठाकरे गटाचे काय जाणार?

गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.

श्रद्धाच्या हाडांची पावडर करून आफताबने रस्त्यांवर विखुरली

गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ई बस सेवेचे उदघाटन झाले होते. सध्या बेस्टच्या एकूण ४१० ई बस सेवा कार्यरत आहेत. ज्यात बेस्टच्या प्रीमियम बसचा समावेश आहे. गेल्याच आठवड्यात नागरी संस्थेने आपल्या महानगरपालिका बजेटमध्ये संपूर्ण शहरात ३,००० नवीन ई बस सुरु करण्याचा उल्लेख केला आहे.  ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या या बस सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यात प्रीमियम बसेससह ४१० ई बसेस असून  या बसेसची रंगसंगती आकर्षक असून या बसेस लाँदांच्या स्विच मोबिलिटी या कंपनीच्या असून भारतात त्यांनी हिंदुजा ग्रुप बरोबर करार केला आहे. गेल्याच वर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे अनावरण यशवंतराव चव्हाण सेन्टर येथे एका भव्य सोहळ्यात करण्यात आले. होते.

 

 

 

Exit mobile version