पैगंबर यांच्याबद्दलच्या विधानाचा वाद हा भारताचा अंतर्गत मुद्दा

पैगंबर यांच्याबद्दलच्या विधानाचा वाद हा भारताचा अंतर्गत मुद्दा

बांगलादेशचे मत

भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाद निर्माण झाले. आखाती देशांमध्ये या घटनेचे पडसाद उमटले होते. मात्र, भारताचा शेजारी देश बांगलादेशाने यावर काही प्रतिक्रिया न दिल्याने या मुद्द्यावर तडजोड केल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र, हा निर्माण झालेला वाद ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे बांगलादेशने स्पष्ट केले आहे.

सध्या निर्माण झालेला वाद हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून इतर देशांप्रमाणे बांगलादेशमध्ये लक्ष वेधून घेणारा असा हा मुद्दा नसल्याचे देताना बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मेहमूद यांनी स्पष्ट केले आहे. वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर तक्रार दाखल झाली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, असा आम्हाला विश्‍वास आहे, असेही ते म्हणाले. अशी विधाने करणे म्हणजे सर्व अंतर्गत राजकारणाचा परिणाम असतो, याची जाणीव भारत आणि बांगलादेश सरकारला आहे. आमचे संबंध चांगले असून एकमेकांमध्ये सामंजस्य आहे, असे हसन मेहमूद म्हणाले.

हे ही वाचा:

 

आज राहुल गांधींची पुन्हा ईडी चौकशी

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुण्यतिथीनिमित्त मोखाड्यात कार्यक्रम

पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त बोलल्यावर त्याचा निषेध करायलाच हवा. भारताने विधान करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई केल्याबद्दल अभिनंदनही त्यांनी केलं आहे. तसेच त्यांच्या विधानानंतर निषेध नोंदवला असून बांगलादेशासाठी हा मुद्दा अंतर्गत नसून बाह्य मुद्दा आहे. पण असे काही घडल्यास अनेकदा इस्लामिक देशांमध्ये त्याचे पडसाद उमटतात, असे हसन मेहमूद म्हणाले.

Exit mobile version