‘मेटा’ ठप्प झाल्यामुळे कंपनीला १०० मिलियन डॉलर्सचं नुकसान

मेटाच्या तीनही मोठ्या सोशल साईट्स बंद असल्याच्या बातम्या येऊ लागताच कंपनीचे शेअर्स घसरले

‘मेटा’ ठप्प झाल्यामुळे कंपनीला १०० मिलियन डॉलर्सचं नुकसान

मेटाचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मंगळवार, ५ मार्च रोजी रात्री काही तासांसाठी बंद पडले होते. जगभरातील वापरकर्त्यांना फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेड्सवर लॉगइन करण्यास आणि वापरण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान, काही काळासाठी व्हॉट्सअ‍प देखील बंद पडलं होतं. त्यानंतर काही तासांनी ही सेवा सुरळीत झाली पण, तोपर्यंत मेटाला अब्जावधींचे नुकसान झाले होते.

मंगळवारी रात्री अचानक जगभरातील कित्येक फेसबुक वापरकर्त्यांचे अकाउंट लॉगआऊट झाले होते. तर इन्स्टाग्रामवर फीड रिफ्रेश करण्याला आणि इतर गोष्टींना अडचण येत होती. व्हॉट्सअ‍प मेसेजही जात नसल्याच्या तक्रार होऊ लागल्या होत्या. मेटाचे अधिकारी अँडी स्टोन यांनी आपल्याला या अडचणींची कल्पना असल्याची माहिती ‘एक्स’ पोस्ट करुन दिली. यानंतर सुमारे दोन तासांनंतर मेटाच्या सर्व सेवा सुरळीत झाल्या. दरम्यान, या ग्लोबल आउटेजमुळे मेटा आणि मार्क झुकरबर्ग यांच्यावर जगभरातून टीका करण्यात आली. अशातच कंपनीचं आर्थिक नुकसानही झालं.

हे ही वाचा :

नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणात जी एन साईबाबा निर्दोष

बलात्कार पीडित स्पॅनिश महिलेच्या पतीला १० लाखांची भरपाई

पंतप्रधान मोदींच्या मशालीने मुस्लिमांमध्ये पसरलेला अंधार दूर करेन!

रणजी ट्रॉफी: मुंबईची तामिळनाडू संघावर मात, फायनलमध्ये धडक!

मेटाच्या तीनही मोठ्या सोशल साईट्स बंद असल्याच्या बातम्या येऊ लागताच कंपनीच्या शेअरची किंमत १.५ टक्क्यांनी खाली गेली. मंगळवारी अमेरिकेतील शेअर मार्केट बंद होताना मेटाच्या शेअरची किंमत १.६ टक्क्यांनी खालीच होती. यामुळे मार्क झुकरबर्गचं सुमारे १०० मिलियन डॉलर्सचं नुकसान झालं असू शकतं, असं मत वेडबुश सिक्युरिटीजचे मॅनेजिंग डिरेक्टर डॅन आयव्हिस यांनी डेली मेलशी बोलताना व्यक्त केलं. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा तब्बल ८ अब्ज रुपयांहून अधिक होतो. या ग्लोबल आउटेजचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही.

Exit mobile version