ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत लेबर पार्टीने दमदार यश मिळवले आहे. केअर स्ट्रॅमर यांच्या नेतृत्वाखाली लेबर पक्षाने ६५० पैकी ४१२ जागा जिंकण्याचा पराक्रम केला. निवडणूक प्रचारादरम्यान प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर तसेच प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी लिहिलेल्या ‘सनातन धर्म : सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’ या पुस्तकाचेही खूप कौतुक झाले. स्वतः स्ट्रॅमर याना या पुस्तकाची प्रत प्रदान करण्यात आली तेव्हा त्यांनीही पुस्तकाचे कौतुक केले. एकप्रकारे सनातन धर्मावरील हे पुस्तक स्ट्रॅमर यांच्यासाठी शुभशकून ठरला, अशी भावना व्यक्त होत होती.
या विजयाबद्दल प्रशांत कारूळकर यानी स्ट्रॅमर यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत भारतीयांना आकृष्ट करण्यासाठी सगळे उमेदवार हिंदू धर्माबद्दल आस्था दाखवत होते. ब्रिटनमध्ये हिंदुत्वाबद्दल एक कुतुहल तिथल्या स्थानिक उमेदवारांत दिसून येते. अनेक उमेदवार हे या प्रचारादरम्यान मंदिरांना भेटी देत होते. त्याचदरम्यान विवानच्या या पुस्तकाची चर्चा होत होती. या निवडणुकीत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या कँझर्व्हेटिव्ह पक्षाला हार सहन करावी लागली. त्यांना १२१ जागा जिंकता आल्या.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी या पुस्तकाचे कौतुक केले असून विवानने एवढ्या कमी वयात हे पुस्तक लिहिले याबद्दलही त्याला शाबासकी मिळाली.
हे ही वाचा:
तामिळनाडू बसपाच्या प्रदेशाध्यक्षांची धारदार शस्त्राने हत्या
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना क्लीनचीट
जाग हिन्दू बांधवा प्राण संकटी तरी …
जगातील पहिली सीएनजी बाईक नितीन गडकरींच्या हस्ते पुण्यात लाँच
लेबर पार्टीचे उमेदवार केअर स्ट्रॅमर यांना लंडनमधील ज्येष्ठ पत्रकार हरिदत्त जोशी यांनी हे पुस्तक प्रदान केले. स्ट्रॅमर यांनीही या पुस्तकाचे कौतुक केले आणि विवानच्या प्रयत्नांबद्दल त्याची प्रशंसाही केली. स्ट्रॅमर हे ब्रिटनच्या राजकारणात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. ते पेशाने बॅरिस्टर आहेत. २०२०पासून ते लेबर पार्टीचे नेते आणि विरोधी पक्ष नेता म्हणूनही काम करत आहेत. सध्या ते ब्रिटिश संसदेचे सदस्यही आहेत. विशेष म्हणजे तेही १६व्या वर्षापासून लेबर पार्टीत काम करू लागले. लेबर पार्टीला १४ वर्षांनी सत्तेत येण्याची संधी मिळाली आहे.