जुहू समुद्रात या जलचराचे आक्रमण

जुहू समुद्रात या जलचराचे आक्रमण

रविवारी जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर सुट्टीचा आनंद लुटताना आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या समुद्रातील जलचरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तीन जणांना ब्लू बॉटल जेलीफिशचा दंश झाला आहे. जुलैच्या अखेरीपासून जुहू समुद्रात ब्लू बॉटल जेलीफिश आले आहेत. समुद्र किनारी सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत. पण या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून नागरिक पाण्यात जात असतात.

रविवारी स्वातंत्र्य दिवसाची आणि रविवारची सुट्टी एकत्र आल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने जुहूच्या किनारी गर्दी केली होती. ब्लू बॉटल जेलीफिशचा धोका दर्शवणारे फलक जुहू किनारी लावण्यात आले आहेत तरीही कोणालाही न जुमानता नागरिक पाण्यात जात होते. सकाळी तीन जणांना ब्लू बॉटल जेलीफिशने दंश केल्याची माहिती जुहू येथील लाईफगार्ड जगदीश तांडेल यांनी दिली. घटनेनंतरही नागरिकांना अनेकदा समजावूनही, इशारा देऊनही नागरिक ऐकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मेघालयात ‘या’ कारणासाठी गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा

राशीद खानचं कुटुंब संकटात?

‘या’ विमा कंपनीचे होणार खासगीकरण

अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्र सैन्य पाठवणार?

सुट्टीच्या दिवशी पर्यटक कोणालाही जुमानत नसल्याचे निरीक्षण पोलीस आणि किनाऱ्यावरील लाईफगार्ड्सनी नोंदवले आहे. सकाळी घडलेल्या घटनेनंतरही पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आणि पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे मोठ्या संख्येने पर्यटक आल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवणे कठीण होत असल्याचेही सांगण्यात आले.

जुहू किनारी ब्लू बॉटल जेलीफिशविषयी सावधानतेचा इशारा देणारे फलक लावले असले, तरी मुख्य प्रवेशाजवळ असणारा फलक खाली पडला आहे. दुसरा फलक पोलीस चौकीजवळ असल्याने तो फलक पर्यटकांच्या नजरेस पडत नाही, त्यामुळे संभाव्य धोक्याची कल्पना पर्यटकांना नसते. पर्यटकांना योग्य माहिती मिळाल्यास कोणीही आपला जीव धोक्यात टाकून पाण्यात जाणार नाही असे मत जुहू किनारी सकाळी पायी फेरफटका मारणाऱ्या काहींनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version