इराणी वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यामुळे मध्य पूर्वेकडील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती

इस्त्रायलनेही आपले सशस्त्र दल पूर्ण सुसज्ज ठेवले आहे

इराणी वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यामुळे मध्य पूर्वेकडील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती

१ एप्रिल रोजी, मध्य पूर्वेकडील आधीच अनिश्चित असलेल्या परिस्थितीने धोकादायक वळण घेतले आहे. इस्रायलने सीरियाच्या दमास्कसमधील इराणी वाणिज्य दूतावासाला लक्ष्य केले, परिणामी लेबनॉन आणि सीरियामधील त्यांचे सर्वांत वरिष्ठ कमांडर जनरल मोहम्मद रझा जाहेदी यांच्यासह इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे सात सदस्य ठार झाले. एखाद्या देशाच्या वाणिज्य दूतावासावरील हल्ला हा त्याच्या सार्वभौम भूमीवरील हल्ला मानला जातो. त्यामुळे इराणने इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारल्यास मध्य पूर्वेकडील परिस्थिती आणखी चिघळू शकते.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी आधीच घोषणा केली आहे की या हल्ल्यासाठी इस्रायलला शिक्षा दिली जाईल, तर अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे. या प्रदेशातील आपल्या सैन्यांविरुद्ध हल्ला होईल, या भीतीने अमेरिकेने आपल्याला या हल्ल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना नव्हती आणि आमचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याची सारवासारव केली आहे.

इस्त्रायलनेही आपले सशस्त्र दल पूर्ण सुसज्ज ठेवले आहे. हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा निरीक्षण करत आहेत तर येणाऱ्या क्षेपणास्त्रांना मार्गदर्शनात अडथळा आणण्यासाठी जीपीएस प्रणाली अक्षम करण्यात आली आहे. लोकांना सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये हलवले जात आहे आणि इस्रायलमधील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर काढत असल्याच्या बातम्या आहेत. इस्रायलकडून या भागातील आपले दूतावासही रिकामे करत असल्याच्या बातम्या आहेत. इराण इस्रायलवर कठोर कारवाई करेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

ऑक्टोबर २०२३मध्ये इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू झालेल्या संघर्षापासून इराणी मालमत्तेवर किंवा कमांडरवर झालेला हा पहिला हल्ला नाही. ३ जानेवारी रोजी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) कमांडर जनरल कासेम सुलेमानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दुहेरी स्फोट झाले. इराणच्या केरमन शहरात जवळपास १०० लोक मारले गेले. १९७९मधील इराणच्या क्रांतीनंतर हा देशातील सर्वात वाईट दहशतवादी हल्ला होता. सुलेमानी हे खमेनेईच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जात होते आणि २०२०मध्ये इराकमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

यापूर्वी, २५ डिसेंबर २०२३रोजी, इराणचा लेव्हंटमधील सर्वात प्रभावशाली लष्करी कमांडर, सय्यद रझी मौसावी, दमास्कसमध्ये इस्त्रायलच्या संशयित हवाई हल्ल्यात ठार झाला होता. याशिवाय, गेल्या काही महिन्यांत इतर अनेक इराण-समर्थित दहशतवादी कमांडरना लक्ष्य करण्यात आले आहे. यावेळी मात्र, इस्रायलने इराणच्या “सार्वभौम भूमीवर” हल्ला केला आहे.

हे ही वाचा:

बलुचिस्तानमधून महिन्याभरात २२ जणांचे अपहरण

पाकिस्तान लष्कराकडून पत्नीवर विषप्रयोग; इम्रान खान यांचा आरोप

मोदींच्या काळात वाढली राहुल गांधींची शेअर बाजारातील गुंतवणूक

म्हणे प्रपोगंडा फिल्म… ‘द केरळ स्टोरी’ प्रसारणाला विजयन यांचा विरोध

इराण कधी हल्ला करू शकतो?

५ एप्रिल हा रमजानचा शेवटचा शुक्रवार आहे आणि म्हणून एक शुभ दिवस आहे. इराणमध्ये हा दिवस अल कुद्स दिवस म्हणूनही साजरा केला जातो. वरिष्ठ अल कुड्स कमांडरच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून, ५ एप्रिल ही संभाव्य तारीख असू शकते. तथापि, इराण लोकांच्या धार्मिक भावनांच्या कारणास्तव कदाचित या दिवशी हल्ला केला जाणार नाही. हमासने ७ ऑक्टोबर रोजी हल्ल केला होता. त्याला ७ एप्रिल रोजी सहा महिने होत आहेत. त्यामुळे ही तारीखदेखील या हल्ल्याची होऊ शकते.

Exit mobile version