इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे!

इराणी माध्यमांनी दिली माहिती

इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे!

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. यासोबतच हेलिकॉप्टर प्रवसात त्यांच्यासोबत असणारे परराष्ट्र मंत्री आणि इतर काही अधिकारी अपघातात ठार झाले आहेत. अजरबैजानमधील घनदाट आणि पर्वतीय भागात रविवारी हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. या हेलिकॉप्टरमधून इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्र्यांसह इतर अधिकारी जात होते. हा अपघात कशाने झाला याचा तपास सुरू असतानाच आता या प्रकरणी नवे अपडेट समोर आले आहे.

ज्या हेलिकॉप्टरमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, देशाचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान, इतर अधिकारी आणि क्रू सदस्य प्रवास करत होते, ते हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश झाले, असे इराणच्या राज्य माध्यमांनी म्हटले आहे. खराब हवामानाची नोंद या भागात झाली होती त्यानंतर आता ही नवी माहिती समोर आली आहे.

इराणमधील दोन सर्वात प्रभावशाली नेत्यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिवाय सध्या मध्य पूर्व भागामध्ये तणावाचे वातावरण आहे. सध्या इराणचे उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांना कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खेमैनी यांनी त्यांना नवीन राष्ट्रपतींची निवड ५० दिवसांच्या आत होईल याची खात्री करण्यास सांगितले आहे, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे.

अजरबैजानवरुन परतताना इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. खराब हवामानामुळे इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. रविवारी संध्याकाळी या हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग झाले होते त्यानंतर हेलिकॉप्टरशी संपर्क होत नव्हता. खराब हवामानामुळे बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध लावण्यात अनेक अडचणी येत होत्या.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींना मतदान करू नये, असे सांगणाऱ्या शिक्षकाला अटक

पुण्यातील पोर्शे मृत्यूप्रकरण; गदारोळानंतर अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून सुनावणी होण्याची शक्यता

‘आम्ही देऊ मुस्लिमांना आरक्षण’

पुणे पोलिसांची कारवाई; फरार बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल अटकेत

या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियन, पूर्व अज़रबैजानचे अयातुल्ला अल-हाशेम आणि पूर्व अजरबैजान प्रांताचे गवर्नर मालेक रहमतीसोबत त्यांचे अंगरक्षक सुद्धा होते.

Exit mobile version