अफगाणिस्तानच्या खासदाराला आला मेसेज आणि झाले दुःख अनावर…

अफगाणिस्तानच्या खासदाराला आला मेसेज आणि झाले दुःख अनावर…

तालिबानने अफगानिस्तानवर कब्जा केल्यावर तिथल्या लोकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. अफगाणिस्तानमधील एक खासदार महिला आपल्या आईच्या उपचारासाठी दोन आठवड्यापूर्वी भारतात आली होती. अफगाणिस्तानमधील परिस्थितीची माहिती देणारे अनेक मेसेजेस तिला दरोरज मिळत होते. पण सोमवारी दुपारी तिला तिच्या भावाचा काबुलहून ‘तालिबानी इथे आले आहेत. शेजारी आहेत’ अशा आशयाचा संदेश आला आणि ती स्तब्ध झाली.

ही महिला आपल्या आईला गुरूग्राममधील रुग्णालयात उपचारसाठी घेऊन आली होती. काबुल त्यांच्या ताब्यात आहे. सत्तापालट झाली आहे. राष्ट्राध्याक्षांनी देश सोडला आहे. महिलेच कुटुंब अफगाणिस्थानात आहे. महिलेच्या कुटुंबात तिची दीड वर्षाची मुलगी आणि १९ वर्षाचा मुलगा असून दोघांच्या काळजीने महिलेच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत. मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की असे दिवस इतक्या लवकर येतील, असे ३९ वर्षाच्या खासदार महिलेने सांगितले.

हे ही वाचा:

मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस

मच्छीमारांच्या अडचणींना उधाण

रॉजर फेडररचा टेनिसमधून संन्यास? काय झाले आहे वाचा…

राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

मी इथे किती दिवस राहू शकते माहित नाही, इथल्या सरकारला मी ओळखत नाही आणि मी अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकत नाही. माझे कुटुंब तिथे संकटात आहे. तिथल्या अधिकाऱ्यांशी मी सतत संपर्कात होते, पण तिथे असे काही होऊ शकेल अशी माहिती कोणीही दिली नाही. मी भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती महिलेने दिली आहे. महिला सध्या आपल्या आई आणि बहिणीसोबतच थांबणार असून तिच्याकडील पैसे किती दिवस पुरतील याचीही खात्री तिला नाहीये.

Exit mobile version