टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी वारंवार भारतात टेस्लाचा व्यवसाय चालू करण्याबाबत इच्छा प्रकट केली होती. मागील वेळेस त्यांनी टेस्ला भारतात २०२१ मध्ये येईल असे विधान केले होते. आता टेस्ला भारतातील काही प्रमुख शहरांत शोरूमसाठी जागेच्या शोधात आहे.
टेस्लाला भारतात तीन शहरांत रस आहे. मुंबई, नवी दिल्ली आणि बंगळूरू या शहरांत जागा शोधत तर आहेच. त्याबरोबरच टेस्ला भारतात एका अधिकाऱ्याच्या शोधात देखील आहे, जो भारतातील सर्व कारभार सांभाळू शकेल.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन?
मुंबईत उपलब्ध होणार हरित उर्जेचा पर्याय
टेस्लाने भारतात यापूर्वीच भारतीय नावाने नोंदणी केली होती. ही स्थानिक कंपनी भारतात टेस्ला सेडान ३ आयात करून त्याच्या विक्रीचे काम करणार आहे.
ही कंपनी आता शोरूमसाठी जागेच्या शोधात आहे. कंपनीला त्यासाठी प्रत्येक ठिकाणी २०,००० ते ३०,००० स्क्वे.फुट जागेची गरज आहे. ही जागा शोरूम अधीक सर्विस सेंटर असेल.
त्यासाठी टेस्लाने जागतिक पातळीवरील जागेबाबत सल्लागार कंपनी सीबीआरई ग्रुपचे जागा शोधण्यासाठी सहाय्य घेतले आहे. ही कंपनी या तीन शहरांमध्ये टेस्लासाठी जागा शोधत आहे. परंतु मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांत टेस्लाच्या गरजांएवढी मोठी जागा मिळणे अवघड झाले आहे.
“जगातील टेस्लाच्या इतर शोरूम पाहिल्या तर त्या वेगळाच अनुभव देतात. त्यांत थोडाफार बदल करून त्यांचेच प्रारूप भारतात तयार करण्यात येणार आहे.” अशी माहिती कंपनीतील एका खासगी स्रोताकडून प्राप्त झाली.