सीरियामध्ये दहशतवाद्यांचा गावकऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार; १८ जणांचा मृत्यू

हल्ल्यात १६ हून अधिक जखमी तर ५० हून अधिक जण बेपत्ता

सीरियामध्ये दहशतवाद्यांचा गावकऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार; १८ जणांचा मृत्यू

पश्चिमी आशियाई देश सीरियामध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दहशतवाद्यांनी पूर्व सीरियातील ग्रामीण भागामध्ये अंदाधुंद गोळीबार सुरु केला होता. आतापर्यंत या हल्ल्यात १८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, १६ पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

इस्लामिक स्टेट म्हणजे आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी पूर्व सीरियामध्ये हल्ला केला आहे. हल्ला इराकच्या सीमेजवळ पूर्व प्रांत दीर अल-जौरच्या कोबाजेब शहरातील वाळवंटात झाला आहे. गावात काही गावकरी फळं गोळा करण्याचे काम करत होते. यावेळी काही दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या फळांची किंमत जास्त असते. त्यामुळे अनेक लोक ही फळे गोळा करण्यासाठी बाहेर पडत असतात. अचानक सुरु झालेल्या या गोळीबारामुळे अनेकांना पळण्याची देखील संधी मिळाली नाही. यात १८ जणांचा मृत्यू झाला तर १६ पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय ५० पेक्षा अधिक लोक बेपत्ता असल्याचं कळत आहे. त्यामुळे आयएसने त्यांचे अपहरण केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये सरकार समर्थक राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या चार सदस्यांचा देखील समावेश आहे.

हे ही वाचा :

पुढील पाच वर्षात भारताचे ‘नाणे’ खणखणीत

मध्य प्रदेशातील गुना विमानतळावर विमान कोसळले!

पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता

हा कसला राजा हा तर भिकारी!

सीरिया हा दहशतवादाच्या संकटाने ग्रस्त असा पीडित देश आहे. देशात गरिबीने उच्चांक गाठला आहे. याठिकाणी अमेरिका आणि इस्राइल सातत्याने मोठ्या प्रमाणात हल्ले करत असते. त्यामुळे या देशाची बिकट अवस्था आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोक गरिबी रेषेच्या खाली असल्याचं सांगितलं जातं. गतवर्षी या देशात मोठा भूकंप आला होता आणि तेव्हापासून देश आर्थिकदृष्ट्या अधिक तळाला गेला आहे.

Exit mobile version