दहशतवादी राणाच्या पळवाटा बंद! प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तहव्वूर राणाला भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा

दहशतवादी राणाच्या पळवाटा बंद! प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून दणका मिळाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची त्याची विनंती फेटाळून लावली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे तहव्वूर राणाला आता भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा हा त्याचे भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी सातत्याने पळवाटा शोधत होता. अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेने आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या भारतातील प्रत्यार्पणासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतरही तहव्वूर राणा न्यायालयाची दारे ठोठावत होता. ६ मार्च रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एलेना कागन यांनी त्याची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतरही तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडे भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यासाठी आणखी एक याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिकाही आता फेटाळण्यात आली आहे.

सोमवारी, सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर न्यायालयाने अर्ज नाकारला अशी सूचना पोस्ट करण्यात आली. भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी आग्रह धरत आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये भारताने त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे. एका महत्त्वपूर्ण घडामोडीत, या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्यार्पणाची घोषणा केली आणि म्हटले की त्याला न्याय मिळेल. “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की माझ्या प्रशासनाने २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील कट रचणाऱ्यांपैकी एक आणि जगातील अत्यंत दुष्ट व्यक्तींपैकी एकाचे (तहव्वुर राणा) भारतात न्यायाला सामोरे जाण्यासाठी प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. तो न्यायाला सामोरे जाण्यासाठी भारतात परत जात आहे,” असे ट्रम्प म्हणाले होते. तर, प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले.

हे ही वाचा:

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा!

सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांच्या व्हिसावर घातली बंदी; कारण काय?

मुलीला रस्त्यात छेडले, कर्नाटकचे गृहमंत्री म्हणतात, अशा घटना घडत असतात!

“टीम इंडियातून बाहेर – पण आयपीएलमध्ये फायर!”

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला एफबीआयने २००९ मध्ये शिकागो येथे अटक केली होती. तो पाकिस्तानी- अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे. राणा हा या हल्ल्यातील एक प्रमुख व्यक्ती आहे असून दहशतवाद्याला पाठिंबा देण्यासाठी त्याला आणि इतरांना पाकिस्तानमध्ये मदत केल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. राणानेच ब्लू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.

राज ठाकरेंकडून तरी शिका... | Dinesh Kanji | Raj Thackeray | Marathi | MNS|

Exit mobile version