अतिरेकी संघटना हिजबुल्लाचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणाली आयर्न डोमने सर्व क्षेपणास्त्र निकामी केल्याची माहिती

अतिरेकी संघटना हिजबुल्लाचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान आता मध्य पूर्व आशियातील तणाव अधिक वाढला आहे. काही दिवसांपूर्वीचं हमासचा प्रमुख कमांडर इस्माइल हानिया याचा इराणमध्ये घुसून खात्मा करण्यात आला. या हल्ल्यामागे इस्रायल असल्याचा दावा करण्यात येत असून यानंतर हमाससह इराण आणि त्यांचे मित्रदेश इस्रायलशी बदला घेण्यासाठी पेटून उठले आहेत. इराण आणि हमास यांच्याकडून कधीही इस्रायलवर हल्ला होण्याची शक्यता असतानाच आता इराण समर्थक अतिरेकी संघटना हिजबुल्लाने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे.

हमासचा प्रमुख कमांडर इस्माइल हानिया याच्या हत्येनंतर हिजबुल्लाने शनिवारी संध्याकाळी दक्षिण लेबनॉनमधून उत्तर इस्रायलमध्ये हल्ला केला. परंतु, इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणाली आयर्न डोमने सर्व क्षेपणास्त्र निकामी केल्याची माहिती आहे. अनेक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले गेले. या हल्ल्यात इस्त्रायलचे काहीच नुकसान झाले नाही. इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी हमासच्या राजकीय नेत्याच्या हत्येला उत्तर देण्यासाठी शनिवारी हा केला, असं बोललं जात आहे.

इस्त्रायलला सध्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर संघर्षाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे गाझा आणि रफाहमध्ये हमासच्या विरोधात लष्करी कारवाई सुरू आहे, तर दुसरीकडे आता लेबनॉन सीमेवर हिजबुल्लाशी सामना करावा लागत आहे. इराणकडूनही इस्त्रायलविरोधात कारवाईची तयारी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी इस्त्रायलने लेबनानमध्ये हवाई हल्ला केला होता. त्या हल्ल्यात १७ वर्षीय मुलगा ठार झाला होता. तसेच सहा जण जखमी झाले होते. त्यामुळे आता हिजबुल्लाने हा हल्ला केला.

हे ही वाचा:

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात पावसाचा प्रकोप; विविध घटनांमध्ये १६ लोकांचा मृत्यू

गांधी-वाड्रा परीवाराच्या धर्म-जातीबाबत लपवाछपवी का? |

बीजेडीच्या खासदाराचा काल राजीनामा, आज भाजपात प्रवेश !

वायनाडमधील आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेला धावून!

इराण-समर्थित अतिरेकी गट हिजबुल्लाचा प्रमुख कार्यकर्ता अली अब्द अली हा दक्षिण लेबनॉनमधील बाजोरीह येथे शनिवारी सकाळी इस्रायली ड्रोन हल्ल्यात ठार झाला होता. इस्रायली सैन्याने मारले गेलेल्या अली याला हिजबुल्लाच्या दक्षिण आघाडीवर प्रमुख दहशतवादी म्हणून ओळखले जात होते.

Exit mobile version