दहशतवाद्याला सोडवण्यासाठी अमेरिकेत ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर हल्ला

दहशतवाद्याला सोडवण्यासाठी अमेरिकेत ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर हल्ला

अमेरिकेतील टेक्सासमध्ये शनिवारी १५ जानेवारी रोजी एका दहशतवाद्याने ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर (सिनेगॉग) हल्ला करून चार जणांना ओलीस ठेवले आहे. त्यातील एकाची सुटका करण्यात आली आहे. दहशतवाद्याने त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी हा हल्ला केला आहे. टेक्सास तुरुंगात बंद असलेल्या पाकिस्तानी न्यूरोसायंटिस्ट आफिया सिद्दिकीची सुटका करण्यात यावी अशी मागणी या दहशतवाद्याने केली आहे.

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी (अमेरिकेची वेळ) डलास भागातील एका सिनेगॉगमध्ये काही लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे त्यांनी सांगितले. टेक्सास पोलीस, स्वाट स्क्वाड आणि एफबीआय टीम घटनास्थळी पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या घटनेची माहिती घेतली आहे.

हे ही वाचा:

ब्रिटिश पंतप्रधानपदासाठी भारतीयाचे नाव का?

आंतरजातीय विवाह केला म्हणून १५० दाम्पत्यांना केले बहिष्कृत

निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील रॅली, सभांवरची बंदी वाढवली

‘हरे रामा हरे कृष्णा’चा जप सुरूच

कोण आहे आफिया सिद्दिकी?

आफिया सिद्दीकी ही पाकिस्तानी नागरिक आणि वैज्ञानिक आहे. ती एक क्रूर अशी दहशतवादी असून लेडी अल कायदा म्हणूनही तिची ओळख आहे. तिने मेसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून न्यूरोसायन्समध्ये पीएचडी केली आहे. २००३ मध्ये दहशतवादी खालिद शेख मोहम्मद याने एफबीआयला सिद्दीकीविषयी पुरावा दिला होता, त्यानंतर आफियाला अफगाणिस्तानातून अटक करण्यात आली. तेथे तिने बगरामच्या तुरुंगात एफबीआय अधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तिला अमेरिकेत पाठवण्यात आले होते. न्यूयॉर्कच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तिला अमेरिकेत ८६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतरही एफबीआयने मे २००२ मध्ये आफिया आणि तिचा पती अमजद खान यांची दीर्घकाळ चौकशी केली होती.

Exit mobile version