दहशतवादी हाफिज सईदच्या जवळच्या सहकाऱ्याची कराचीत गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानात आणखी एक टार्गेट किलिंग

दहशतवादी हाफिज सईदच्या जवळच्या सहकाऱ्याची कराचीत गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना घडत असल्याचे वारंवार समोर आल्यानंतर आता कराचीमधून आणखी एक टार्गेट किलिंगची घटना समोर आली आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चा नेता हाफिज सईदच्या जवळच्या सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल रहमान असे हत्या करण्यात आलेल्याचे नाव आहे.

कराचीतील शेर्पो कॉलनीमध्ये गोळीबाराची ही घटना घडली. माहितीनुसार, दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी रहमानवर गोळीबार केला. हल्ल्याच्या वेळी रहमान एका दुकानात उभा होता. गोळीबाराची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या व्हिडिओमध्ये हल्लेखोर रहमानवर गोळीबार करून पळून जाताना दिसत आहेत. या हल्ल्यात रहमानचा एक सहकारी आणि वडील गंभीर जखमी झाले आहेत.

रहमान हा अहले-ए-सुन्नत वाल जमात नावाच्या संघटनेचा प्रमुख होता. या संघटनेचे तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तानशी (टीटीपी) जवळचे संबंध आहेत. कारी अब्दुल रहमान हे अहले सुन्नत वाल जमातचे प्रमुख होते. ही संघटना पूर्वी सिपाह-ए-शहाब म्हणून ओळखली जात होती. त्याचे जैश-ए-मोहम्मदशीही चांगले संबंध होते. रहमानच्या हत्येनंतर, अहले-ए-सुन्नत वाल जमातच्या कार्यकर्त्यांनी कराचीतील जिना रुग्णालयाबाहेर त्याचा मृतदेह घेऊन निदर्शने करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा..

मोदींकडे भारतासाठीचा हजार वर्षांचा दृष्टीकोन!

नमाजावेळी काळी पट्टी बंधणाऱ्यावर काय म्हणाले हुसेन ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कसा होता मार्च?

जोशींनी का सांगितले औरंगजेबचा मुद्दा अनावश्यक ?

याच महिन्यात, लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू कताल सिंघी यालाही अशाच पद्धतीने गोळ्या घालून ठार करण्यात आले. झेलममध्ये झालेल्या गोळीबारात तो मृत्युमुखी पडला. तो हाफिज सईदचा पुतण्या होता. सिंघीचे नाव भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वॉन्टेड यादीत होते. भारतातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे म्हटले जात होते. गेल्या वर्षी ९ जून रोजी जम्मू आणि काश्मीरमधील रियासी येथे झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता.

...म्हणून मोंदीचा नागपूर दौरा ऐतिहासिक! | Mahesh Vichare | Modi In Nagpur |

Exit mobile version