काश्मीरच्या लिथियम साठ्यावर दहशतवाद्यांचा डोळा

काश्मीरच्या लिथियम साठ्यावर दहशतवाद्यांचा डोळा

जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेल्या पांढऱ्या सोन्यावरही दहशतवादी नजर पडली आहे. गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमध्ये लिथियम या पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खनिजाचा प्रचंड साठा आढळून आला आहे. एका दहशतवादी संघटनेने सोमवारी धमकीचे निवेदन प्रसिध्द केले आहे .जम्मू-काश्मीरमध्ये खाणकाम करणाऱ्या कंपनीवर हल्ला केला जाईल, अशी धमकी दहशतवादी संघटनेने निवेदनाद्वारे दिली आहे.

कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरच्या संपत्तीचे ‘शोषण’ आणि ‘चोरी’ होऊ दिली जाणार नाही. ही संपत्ती जम्मू-काश्मीरमधील लोकांची आहेत आणि त्यांच्या हितासाठीच वापरली जावीत, असे अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा:

बालविवाहाविरोधात हिमंता बिस्व सर्मा का आहेत आक्रमक?

सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे-शिंदे गटातील संघर्षावर सुनावणी

पुलावामा हल्ल्यातील जवानांना देशभरातून श्रद्धांजली

पहाटेच्या शपथविधीवरचा पडदा अखेर फडणवीसांनी उघडला; शरद पवार वैतागले

जम्मू-काश्मीरमध्ये ५.० दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केले होते.देशात लिथियमचा मोठा साठा सापडण्याचे देशातील पहिले ठिकाण आहे. हा साठा रियासी जिल्ह्यातील सलाल गावात सापडला आहे. हे गाव माता वैष्णोदेवीच्या डोंगराजवळ वसलेले आहे.

तर गंभीर परिणाम भोगावे लागतील

लिथियम काढण्यासाठी केवळ आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे स्वागत आहे. खाण कामातील नफा जम्मू-काश्मीरच्या जनतेलाही वाटला पाहिजे. कोणत्याही भारतीय कंपनीने यात हात घातल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी पीपल्स अँटी फॅसिस्ट संघटनेने सरकारला दिली आहे.

आयातीवरील अवलंबित्व कमी होईल

इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोन यांसारख्या उपकरणांच्या बॅटरीमध्ये वापरले जाणारे लिथियम इतर देशांतून आयात केले जाते. आता रियासी जिल्ह्य़ातील साठ्याचे शोषण केल्यास देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.

५१ खनिज ब्लॉक्सचा अहवाल सादर

६२ व्या सेंट्रल जिओलॉजिकल प्रोग्रामिंग बोर्डच्या बैठकीत देशातील लिथियम आणि सोन्यासह ५१ खनिज ब्लॉक्सचा अहवाल अलिकडेच राज्य सरकारांना सादर करण्यात आला.

Exit mobile version