23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानी लष्कराच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला

पाकिस्तानी लष्कराच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला

पाकिस्तानी सैन्याकडून एअरबसेवर ऑपरेशन सुरू

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्य लष्कराच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी एअरबेसवर घुसले असून त्यांनी भीषण गोळीबार सुरू केला. त्यामुळे संपूर्ण शहरात दहशतीच वातावरण आहे. तहरीक- ए- जिहाद पाकिस्तानने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

शुक्रवार, ३ नोव्हेंबर- शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी रात्री २ वाजता पंजाब प्रांतातील मियांवली एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी अनेक विमाने नष्ट केली असून एअरबेसच्या भिंतीवर असलेल्या फेन्सिंग कापून हे दहशतवादी आतमध्ये घुसले. त्यानंतर त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. सध्या पाकिस्तानी सैन्याकडून या एअरबसेवर ऑपरेशन सुरु आहे. पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आतापर्यंत चार दहशतवादी मारले गेले आहेत. एअरबेसच्या आतामध्ये फायरिंग आणि स्फोटाचे आवाज ऐकू येत होते.

दहशतवाद्यांनी तीन फायटर जेट्सच नुकसान केले आहे. पाकिस्तान सरकारकडून आतापर्यंत ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. हल्ल्यानंतर आस-पासच्या भागात हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच एअरबेसच्या आसापासचे शाळा-कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

हे ही वाचा:

इस्रायलचा गाझामधील शाळेवर एअर स्ट्राईक; २० जण ठार

उर्फी जावेद आली अडचणीत, बनावट पोलिसांना घेऊन व्हीडिओ बनविल्याचा आरोप

बनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून केली हत्या!

एअरबेसवर हल्ला होण्याच्या एक दिवस आधी ३ नोव्हेंबरला बलूचिस्तानच्या ग्वादरमध्ये पाकिस्तानी सुरक्षा पथकाच्या वाहनाांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात १४ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला होता. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सैनिकांचा ताफा ग्वादर जिल्ह्याच्या पसनीपासून ओरमारा येथे चालला होता, त्यावेळी हा दहशतवादी हल्ला झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा