काबूलमध्ये गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला

काबूलमध्ये गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती आहे. काबूलमधील एका गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला झाला. यावेळी गुरुद्वारामध्ये २० ते २५ लोक उपस्थित असल्याची माहिती असून यामध्ये जखमी किंवा मृतांची संख्या अजून समोर आलेली नाही. गुरुद्वाराच्या आतून गोळीबाराचा आवाज येत होता तर काही अंतरावरून धुराचे लोटही दिसून येत होते.

काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर हल्ला झाला आहे. गुरुद्वाराच्या आत सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे. तर गुरुद्वाराच्या आतून गोळ्यांचा आवाज येत असून इमारतीतून धूर निघत असल्याचंही समोर आलं आहे. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

हे ही वाचा:

१०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट

काँग्रेसच्या महिला आंदोलनात महिलाच गायब

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदालनात आत्महत्येचा प्रयत्न

मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली

सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. आत सात ते आठ लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाकडून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याआधीही ऑक्टोबरमध्ये एका गुरुद्वारावर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, या परिसरात शीख समुदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये शीख समुदायाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Exit mobile version