सोमालियातील एका हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून हा हल्ला मुंबई २६/११ च्या हल्ल्यासारखा असल्याची माहिती समोर आली आहे. अल-शबाब (Al-Shabaab) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले आहेत.
सोमालियाची राजधानी असलेल्या मोगादिशू येथील एका हॉटेलवर अल-शबाब या दहशतवादी गटाच्या दहशतवाद्यांनी एका हॉटेलवर हल्ला केला. दोन कारचा स्फोटदेखील झाला आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल- शबाब या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंबईत झालेल्या २६/११ प्रमाणे हा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर
१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?
कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट
निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास
अल-शबाब हा अल-कायदाशी संबंधित असा एक दहशतवादी गट आहे. अल-शबाब १० वर्षांहून अधिक काळ सोमाली सरकार पाडण्यासाठी लढा देत आहे, अशी माहिती अल जझीराने दिली आहे. अल-शबाब या संघटनेने यापूर्वीही अशाच प्रकारच्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. ऑगस्ट २०२० मध्ये, मोगादिशूमध्ये एका हॉटेलमध्ये हल्ला झाला होता. त्यावेळी साधारण १६ लोक मारले गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी अल- शबाबने घेतली होती.