इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू

इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू

इंडोनेशियामध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. इंडोनेशियाच्या पूर्वेकडील प्रांत पापुआच्या नडुगामध्ये हा हल्ला झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, १६ जुलै रोजी एका फुटीरतावादी गटानं हा हल्ला केला आहे.

‘केकेबी’ या दहशतवादी गटाने जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले. यावेळी दहशतवाद्यांनी एका ट्रकवर हल्ला करून २० जणांना लक्ष केलं. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या हल्ल्यात सुमारे १० जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. केकेबी दहशतवादी गटानं केलेला हा हिंसक हल्ला मानला जातोय.

हे ही वाचा:

ठाणे शहराला अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरी

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

रुबैय्या सईदने यासिन मलिकला अपहरणकर्ते म्हणून ओळखले

‘मी जिथे जातो तिथे माझं मंत्रालय सुरु’

या हल्ल्याबाबत पोलिस तपास करत आहेत. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारच्या हल्ल्यांचं नेतृत्व इजियानस कागोया या दहशतवादी गटानं केलं होतं. हा गट पापुआ प्रांतात सक्रियपणे कार्यरत असलेल्या सात फुटीरतावादी गटांपैकी एक आहे. या घटनेपासून पोलीस आणि लष्कर दहशतवादी गटाशी संबंधित लोकांचा शोध घेत आहेत. कागोया गटानं यापूर्वीही अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत.

Exit mobile version