चिलीच्या जंगलात भीषण वणवा

६४ जणांचा मृत्यू; ११०० घरे जळून खाक

चिलीच्या जंगलात भीषण वणवा

दक्षिण अमेरिकी देशांपैकी एक असलेल्या चिलीमधील जंगलात लागलेल्या वणव्यात सुमारे ६४ जणांचा मृत्यू झाला असून ११०० घरे जळून खाक झाली आहेत. आपत्कालीन सेवा विभागाकडून हेलिकॉप्टर आणि ट्रकच्या मदतीने शहरी भागातील आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. मोठ्या संख्येने लोक यात जखमी झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सुमारे १० लाख लोकसंख्येच्या मध्य चिलीतील वालपराइसो क्षेत्रातील अनेक भागांत काळा धूर पसरला आहे.

वीना डेल मार शहराच्या आजूबाजूच्या भागाला या वणव्याचा सर्वांत अधिक फटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री कॅरोलिना टोहा यांनी सांगितल्यानुसार, वारपराइसो भागाची परिस्थिती अधिक बिकट आहे. रस्त्यांवरही नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. सन २०१०मध्ये चिलीमध्ये आलेल्या भूकंपानंतर आलेली ही सर्वांत मोठी आपत्ती मानली जात आहे. त्या वेळच्या भूकंपात सुमारे ५०० जण मारले गेले होते.

राष्ट्रपती गेब्रियल बोरिक यांनी टीव्हीवर सांगितल्यानुसार, परिस्थिती कठीण आहे. सद्यपरिस्थितीत आग ४३ हेक्टर परिसरात पसरली आहे. या भीषण आगीने डोंगराळ भाग असलेल्या इंडिपेंडेंसिया भागालाही कवेत घेतले आहे. रस्त्यांवर जळालेल्या गाड्या दिसत आहेत.

हे ही वाचा:

‘ग्रॅमी’वर भारतीयांची मोहोर; झाकीर हुसैन यांचा तीन तर, राकेश चौरासियांचा दोन ग्रॅमीने गौरव

द्वेषपूर्ण भाषणाप्रकरणी इस्लामी धर्मोपदेशक ताब्यात!

जो खरा असेल तो ईडीच्या तपासाला सामोरे जाईल, केजरीवालांना गंभीरने लगावला टोला!

‘नव’ नामक वाघाच्या मृत्यूने लुधियाना टायगर सफारी पर्यटकांसाठी झाली बंद!

९२ जंगलांमध्ये लागली आग

मध्य आणि दक्षिण क्षेत्रातील ९२ जंगलांमध्ये आग लागली आहे. मात्र ही आग दाट लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात पसरत चालल्यामुळे ही चिंतेची बाब ठरते आहे. त्यामुळे अनेक लोकांसह घरांना आणि सुविधांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात जंगलामध्ये आग लागणे ही सर्वसाधारण बाब आहे. गेल्या वर्षी कडाक्याच्या उन्हामुळे लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला होता तर, चार लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला फटका बसला होता.

Exit mobile version