पेशावरमध्ये भीषण स्फोट! दोन पाकिस्तानी सैनिक ठार

पेशावरमध्ये भीषण स्फोट! दोन पाकिस्तानी सैनिक ठार

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात बॉम्बस्फोट झाला आहे. या झालेल्या बॉम्बस्फोटात पाकिस्तानी लष्कराच्या फ्रंटियर कॉर्प्सचे (एफसी) दोन जवान ठार झाले आहेत. तर अनेक जण स्फोटात जखमी झाले आहेत. अहवालानुसार, या हल्ल्यात एफसीच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे पेशावरमधील बारा रोड येथे एफसी जवानांचा मृत्यू झाला आहे.

एक दिवसापूर्वी उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील स्पिन वाम भागात गुप्तचर-आधारित कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला, असे लष्करी माध्यम शाखेने सांगितले होते. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा दलांनी उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात एका दहशतवाद्याला ठार केले होते. जेव्हा त्यांनी उत्तर-पश्चिम भागात दहशतवाद्यांविरुद्ध गुप्तचर-आधारित कारवाई केली. यासोबतच त्याच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक

‘परदेशात गेलेला आपला वारसा परत आणणे ही आपली जबाबदारी’

एलोन मस्क यांनी युक्रेनला केली ‘ही’ मदत

‘परदेशात गेलेला आपला वारसा परत आणणे ही आपली जबाबदारी’

पाकिस्तानमध्ये असे हल्ले होतच असतात. नागरिकांच्या ठिकाणांव्यतिरिक्त सुरक्षा दलाच्या केंद्रावर आणि पोलीस ठाण्यांवरही दहशतवादी हल्ल्यांच्या बातम्या सतत चर्चेत असतात. यापूर्वी शहरातील एका पोलिस ठाण्यावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन पोलिस जखमी झाले होते. २५ जानेवारी रोजी बलुचिस्तानमधील केच येथे झालेल्या हल्ल्यात दहाहून अधिक पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेले. त्यांनतर बरोबर एका आठवड्यानंतर, दोन फेब्रुवारी रोजी त्याच प्रांतातील नोश्की आणि पंजगुर जिल्ह्यात एका अधिकाऱ्यासह सात लष्करी जवानांचा मृत्यू झाला.

Exit mobile version