27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाकॅनडात खालिस्तानी समर्थकांकडून मंदिराची तोडफोड; भित्तिचित्रे काढून विद्रूप करण्याचा प्रयत्न

कॅनडात खालिस्तानी समर्थकांकडून मंदिराची तोडफोड; भित्तिचित्रे काढून विद्रूप करण्याचा प्रयत्न

कॅनडातील विश्व हिंदू परिषदेकडून निषेध; कारवाईची मागणी

Google News Follow

Related

कॅनडामध्ये गेल्या काही दिवसांपासून खालिस्तानी समर्थकांकडून सातत्याने मंदिरांना लक्ष्य करण्यात येत आहे. सोमवार, २२ जुलै रोजी एडमंटनमध्ये पुन्हा एका मंदिराची तोडफोड करत विटंबना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मंदिराच्या भिंतीवर भित्तिचित्रे काढत विद्रुप करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेनंतर कॅनडातील हिंदू धर्मियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कॅनडाच्या एडमंटनमध्ये एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली असून, भिंतींवर भित्तिचित्रे रंगवण्यात आली आहेत. या घटनेनंतर कॅनडातील विश्व हिंदू परिषदेने याचा निषेध केला असून कॅनडा सरकारला या वाढत्या अतिरेकी विचारसरणीविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. कॅनडातील विश्वहिंदू परिषदेने ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. कॅनडाच्या एडमंटनमधील स्वामानारायण मंदिरात खालिस्तानी समर्थकांकडून तोडफोड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. तसेच या घटनेचा निषेध करत कॅनडा सरकारकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणीही विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूनंतर खलिस्तान समर्थकांच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत. खालिस्तानी समर्थकांकडून मंदिरांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही त्यांनी अनेकदा कॅनडातील मंदिरांची तोडफोड केलेली आहे.

हे ही वाचा:

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना”

२०२५ च्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ६.५ ते ७ टक्के राहणार

देशातील परीक्षा प्रणालीवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना शिक्षण मंत्र्यांनी सुनावले

“ओबीसी आरक्षणावर शरद पवार, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसलेत”

गेल्यावर्षी मिसिसोंगा येथील राम मंदिराची तोडफोड करून त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर टोरंटो येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने या घटनेचा निषेध नोंदवला होता. तसेच दूतावासाने या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. याशिवाय जानेवारीमध्ये, ब्रॅम्प्टन येथील एका मंदिराची विटंबना करण्यात आली होती. या मंदिराच्या भींतींवर भारतविरोधात घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. तसेच सप्टेंबरमध्ये, BAPS स्वामीनारायण मंदिर, टोरंटोची कॅनडियन खलिस्तानी अतिरेक्यांनी विटंबना केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा