इस्लामिक हल्लेखोरांनी हिंदू मंदिरं गेली १००० वर्ष उध्वस्त केली आहेत. आजही एकेकाळी भारताचा भाग असलेल्या पाकिस्तानात हिंदूंवरील अत्याचार आणि मंदिरांची विटंबना तसेच तोडफोड सुरूच आहे. कालच पक्स्टीनमधील पंजाब प्रांतात, राहिम्यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात नव्यानेच बांधण्यात आलेले एक हिंदू मंदिर उध्वस्त करण्यात आले.
भोंग शहरात रहात असलेल्या हिंदूंनी बांधलेले हे गणपतीचे मंदिर इस्लामिक लोकांच्या गली उतरले असते तरच नवल होते. हे मंदिर बांधून होताच ‘काफ़िरांच्या मूर्ती’ तोडण्याचा आनंद लुटायला आलेल्या मुस्लिम जमावाने या मंदिरातील मूर्ती उध्वस्त केल्या. या घटनेचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांमध्ये वायरल होत आहे.
यापूर्वीही पाकिस्तानात अशा अनेक घटना घडल्या आहेत. याच वर्षी पाकिस्तानच्या खैबर-पख्तुन्वा प्रांतात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. खैबर-पख्तुन्वाच्या करक जिल्ह्यात ही घटना घडली होती.
करक जिल्ह्यातील एका स्थानिक मौलवीने मुस्लिम समाजाला हिंदूंविरोधी चिथावणी दिली. परिणामी माथेफिरू जमावाने हिंदू मंदिरावर हल्ला चढवला. या मौलवीला स्थानिक फुफुटीरतावाद्यांचा पाठिंबा होता.
हे ही वाचा:
सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत पदक
महापूराच्या नावाखाली शिवसेनेची नवी वसुली सुरु
…तर मुख्यमंत्री उद्या कदाचित गेट वे ऑफ इंडियाचंसुद्धा लोकार्पण करतील
पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्ता इंतेशाम अफगाण याने या घटनेचा निषेध केला होता. या घटनेला निंदनीय म्हणत यावरून पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची काय अवस्था आहे याचा अंदाज येतो असे अफघाणने म्हटले होते.