26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरदेश दुनियासिंगापूर एअर शो मध्ये 'तेजस' घेणार भरारी

सिंगापूर एअर शो मध्ये ‘तेजस’ घेणार भरारी

Google News Follow

Related

‘सिंगापूर एअर शो-२०२२` मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना भारतीय हवाई दलाचे ‘तेजस’ हे विमान सहभागी होताना दिसेल. या एअर शो मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची ४४ सदस्यांची तुकडी शनिवार, १२ फेब्रुवारी रोजी सिंगापूरमधील चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. हा एअर शो १५ ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणार आहे. सिंगापूर एअर शो हा एक द्विवार्षिक कार्यक्रम आहे जो जागतिक स्तरावरच्या विमान वाहतूक उद्योगाला त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.

भारतीय हवाई दल स्वदेशी बनावटीचे तेजस एमके – १ लढाऊ विमान यावेळी जगभरातील सहभागी देशांपुढे सादर करणार आहे. तेजस विमान आपल्या एरोबॅटिक्सच्या प्रदर्शनासह त्याच्या उत्कृष्ट हाताळणीची वैशिष्ट्ये आणि कुशलता दाखवून प्रेक्षकांना भुरळ घालेल. हवाई कसरींमध्ये भारतीय दलाचा सहभाग भारताला तेजस विमानाचे प्रदर्शन करण्याची आणि आरएसएएफ (रॉयल सिंगापूर एअर फोर्स) आणि अन्य सहभागी तुकड्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! मोदीविरोधक पत्रकार राणा अय्युबने पीएम केअरला दिली देणगी

आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमिट्स कोसळले

हिजाब वादाप्रकरणी आयबीने दिला पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा!

पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ममता बॅनर्जींना झटका! अधिवेशन केले बरखास्त

पूर्वी भारतीय हवाई दलाने स्वदेशी विमाने आणि एरोबॅटिक संघ तयार करण्यासाठी मलेशियामध्ये एलआयएमए – २०१९ आणि दुबई एअर शो – २०२१ सारख्या एअर शोमध्ये भाग घेतला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा