भारतीय आकाशा पलिकडेही तेजसची भरारी

भारतीय आकाशा पलिकडेही तेजसची भरारी

कोविड-१९ च्या काळातही भारताने एरो-इंडिया हे सैनिकी प्रदर्शन घेण्याचे निश्चित केले आहे. या प्रदर्शनादरम्यान हिंदी महासागरातील देशांचे संरक्षण मंत्रीसुद्धा उपस्थित असणार आहेत. तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन बंगळुरूमध्ये होणार आहे.

भारत सरकारने नुकतेच हिंदुस्थान अएरॉनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) ₹४६ हजार ८९८ कोटींचे तेजस विमानांचे कंत्राट दिले आहे. भारतीय हवाईदलाने ७३ तेजस विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेजस हे भारताने बनवलेले पहिले सिंगल इंजिन फायटर जेट विमान आहे. भारताने हे विमान इतरांनाही विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये व्हिएतनाम, श्रीलंका, मालदीवसह इतर देशांची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदी महासागरातील देशांच्या संरक्षण मंत्र्यांची परिषद खूपच महत्वाची ठरते.

“हे प्रदर्शन जगातील सर्वात मोठे हायब्रीड प्रदर्शन आहे. या वर्षी २०१८ पेक्षा जास्त प्रदर्शक या प्रदर्शनात भाग घेतील.” अशी माहिती संरक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा: अशी घेतली तेजसने गगनभरारी

हिंदी महासागरातील संरक्षण मंत्र्याची परिषद आणि भारतीय हवाईदलाने केलेली तेजस फायटर जेट्सची खरेदी या तिन्ही गोष्टी जुळून आल्यामुळे या वर्षी एरो-इंडियाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version